11 December 2017

News Flash

कळकराय चढाई

मुलुंडच्या चक्रम हायकर्स संस्थेतर्फे कळकराय सुळक्यावर चढाई मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत पंधरा

Updated: January 9, 2013 2:41 AM

ट्रेक डायरी

मुलुंडच्या चक्रम हायकर्स संस्थेतर्फे कळकराय सुळक्यावर चढाई मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत पंधरा वर्षांवरील सर्वाना भाग घेता येईल. या मोहिमेसाठी शुल्क असून आवश्यक प्रशिक्षणासाठी २० जानेवारी रोजी कान्हेरी लेण्यांमध्ये एका शिबिराचेही आयोजन केलेले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अमेया गोखले (९८२००१९५११) यांच्याशी संपर्क साधावा.

पक्षिमित्र संमेलन
चिपळूणच्या पक्षिमित्र संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे अमरावती येथे १२ व १३ जानेवारीला पक्षिमित्र संमेलन आयोजित केले आहे. यंदाच्या संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे मेळघाटातील पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी तसेच अमरावतीच्या वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेचे या संमेलनास सहकार्य लाभले आहे. पक्षिनिरीक्षणाची व्याप्ती वाढवणे ही यंदाच्या संमेलनाची मध्यवर्ती कल्पना असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पक्षी छायाचित्र प्रदर्शन, स्थानिक पक्षिनिरीक्षण भ्रमंती असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही पक्षिनिरीक्षण भ्रमंतीची संधी आहे.
सातपुडा पर्वतरांग, चिखलदरा गिरिस्थान व गाविलगडसारखे महत्त्वाचे किल्ले या भागात आहेत तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सहलही आयोजित केली आहे. या भागात रानिपगळा इतर दुर्मीळ पक्षी आहेत. नोंदणीसाठी डॉ.जयंत वडतकर, सचिव वन्यजीव व पर्यावरण संस्था, अमरावती ६ीू२ 2001@८ंँ.ूे या पत्त्यावर संपर्क साधावा.

First Published on January 9, 2013 2:41 am

Web Title: trek diary 2
टॅग Diary,Trek It