यूथ होस्टेल मालाड शाखेतर्फे येत्या १० ते १३ डिसेंबर दरम्यान कोकण भ्रमंतीचे आयोजन केले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, निवती किल्ला, कुणकेश्वर, रामेश्वर आदी मंदिरांना यामध्ये भेट दिली जाणार आहे. या भ्रमंतीत तंबूत राहण्याचा अनुभव मिळणार आहे. अधिक माहितीसाठी वश्वास सावंत (८०९७६९३४३२) यांच्याशी संपर्क साधावा.

धाकुरी-खाती-सूफी ट्रेक
उत्तराखंडमधील कुमाऊँ गढवाल भाग म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. बर्फाच्छादित पर्वत, खोल वाहत्या नद्या, सूचिपर्णी वृक्षांचे जंगल, दऱ्याखोऱ्यातील गावे आणि विविध रंगांत न्हाऊन निघणारे आकाश या साऱ्यामुळे इथला निसर्ग प्रेमात पाडत असतो. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २६ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान या भागात ‘धाकुरी-खाती-सूफी’ या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेदरम्यान हिमालयाचे सुंदर दर्शन घडते. नंदाकोट, माइकटोली, पनवालीद्वार अशी हिमशिखरे दिसतात. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.