धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com

अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक
अन्नपूर्णा शिखर हे जगातील १० उंच शिखरांपैकी एक आहे. त्याची उंची ८०९१ मीटर (२६,७०० फूट) आहे. या शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारा ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ हा जगातील प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे. अन्नपूर्णा शिखर नेपाळच्या उत्तर भागात येते. अन्नपूर्णा शिखराच्या पूर्वेला मारशिंगडी आणि पश्चिमेला लामजुंग हिमालयाचा भाग येतो. हा ट्रेक विविध डोंगरी गावे, नद्या, झरे, जंगले, डोंगरदऱ्यांमधून जातो. या दरम्यान निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. ८००० मीटरपेक्षा अधिक उंची असणारी अन्नपूर्णा आणि धौलागिरी ही दोन शिखरे दिसतात. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ११ ते २८ मे २०१५ दरम्यान याचे आयोजन केले आहे. या ट्रेकसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी तसेच अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी
संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
आठ मार्च हा सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून ‘निसर्ग सोबती’ तर्फे येत्या १३ ते १५ मार्च दरम्यान खास महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सहलीचे आयोजन केले आहे. ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. या जंगलातील तलावाकाठी पहुडलेल्या मगरी देखील दिसतात. तरी, या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.
कान्हेरी लेण्यांची ओळख
आपल्या प्राचीन वारशाची ओळख व्हावी या हेतूने ‘होरायझन’ संस्थेतर्फे येत्या रविवारी (२ १ डिसेंबर) मुंबईतील कान्हेरी लेण्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीमध्ये अभ्यासकांच्या मदतीने या लेण्यांची माहिती दिली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा अनुप बोकील (७७९८०५००८५) यांच्याशी संपर्क साधावा.

डलहौसी पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या २७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान डलहौसी परिसरात पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

राजगड प्रदक्षिणा
दी नेचर लव्हर्स मालाड संस्थेतर्फे येत्या २५ ते २८ डिसेंबर दरम्यान ‘राजगड प्रदक्षिणा’ मोहिमेचे आयोजन केले आहे. या उपक्रमामध्ये राजगडास तळातून प्रदक्षिणा घातली जाणार आहे. याशिवाय अभ्यासकांच्या मदतीने दुर्गदर्शन, पालखी सोहळा, पारंपरिक वाद्यांचा गजर आदी शिवकाळात घेऊन जाणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२१३४२७०२ किंवा ९८६९५३०१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे जंगल वसलेले आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात.
या जंगलातच इ.स. ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. देशातील महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये रणथंबोर किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावरूनच या जंगलाला ‘रणथंबोर राष्ट्रीय उद्यान’ असे नाव मिळाले. हे जंगल आणि किल्ला भटकंतीचे ९ ते १५ मार्च दरम्यान निसर्ग टूर्सच्या वतीने आयोजन केले आहे. तसेच या सहलीला जोडून जयपूर शहराचीही भटकंती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.