रूपकुंड पदभ्रमण
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २९ एप्रिल ते ९ मे या कालावधीत रूपकुंड येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. तसेच हृषीकेश येथे २२ ते २८ मे दरम्यान पदभ्रमण, राफ्टिंग आदी साहसी खेळांचे आयोजन केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी सुरेंद्र देसाई (९८१९०९१९५४) यांच्याशी संपर्क साधावा.
हिमालयातील पदभ्रमण मोहिमा
भोसला अ‍ॅडव्हेंचर्स फाऊंडेशन, नाशिकतर्फे येत्या उन्हाळय़ाच्या सुटीत माऊंट पतालसू मोहीम (५ ते १४ मे), बियासकुंड ट्रेक (२७ मे ते ५ जून) आणि लेह, लडाख ट्रान्स  हिमालयीन सफारी (१५ जून ते १ जुलै) या तीन पदभ्रमण मोहिमांचे आयोजन
केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९८८१५४७२८० या क्रमांकावर संपर्क
साधावा.
चंद्रशीला पदभ्रमण मोहीम
‘हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशन’तर्फे गढवाल हिमालयातील चंद्रशीला पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेचे सर्वोच्च शिखर हे १३४१५ फूट उंचीवर आहे. या ठिकाणाहून नंदादेवी, त्रिशूल, केदार, चौखंबा आदी हिमशिखरे दिसतात. येत्या २१ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संतोष ९८२०९४७०९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवी सन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. हे जंगल पाहण्यासाठी ‘आसमंत’च्या वतीने १७ ते २१ मे दरम्यान निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९९३०६६०७३१) यांच्याशी संपर्क साधावा.
हिमालयातील मोहिमा
‘झेप’ संस्थेतर्फे आगामी सुटीत हिमालयाच्या विविध भागांत पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. बागेश्वर-नैनिताल (कुमांऊ गढवाल), मनाली, दोडीताल-दारवा, मणिमहेश ग्लेशिअर आदी भागांत या हिमालयातील पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९८२२२९७२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.