News Flash

ट्रेक डायरी:वन्यजीव छायाचित्रण शिबिर

‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या २१-२२ जून दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्यजीव छायाचित्रण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून जंगलातील छायाचित्रणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

| May 21, 2014 08:43 am

वन्यजीव छायाचित्रण शिबिर
‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या २१-२२ जून दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्यजीव छायाचित्रण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून जंगलातील छायाचित्रणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या राष्ट्रीय उद्यानात जाऊन याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांना जंगलातील रात्रीचे जग अनुभवण्याचीही संधी मिळणार आहे. तरी इच्छुकांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतापगड, जावळी पदभ्रमण
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या २३ ते २५ मे दरम्यान प्रतापगड आणि जावळी खोऱ्यात पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रतापगड, रणतोंडीचा घाट, जावळीचे जंगल, पारचा पूल आदी स्थळांना भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

तिकोना पदभ्रमण
‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स अ‍ॅकाडमी’तर्फे येत्या २५ मे रोजी तिकोना किल्ला आमि बेडसे लेणी पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले
आहे. अधिक माहितीसाठी ७३८५८५३१९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 8:43 am

Web Title: trek diary 42
Next Stories
1 दापोलीचा निसर्ग
2 खांदेरी उंदेरीची मोहीम
3 ‘त्या’ हीमप्रपाताची आठवण
Just Now!
X