कोजागरी पौर्णिमेच्या रात्री कल्याणपासून २० किलोमीटरवरील मामणोली गावात आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबत हेमंत मोने या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी राजन पाडलोसकर (९३२२२३१२१६) यांच्याशी संपर्क साधावा.
लोहगड- विसापूर मोहीम
कोल्हापूरच्या ‘न्यू हायकर्स ग्रुप’तर्फे येत्या १९ व २० ऑक्टोबर रोजी भाजे लेणी, लोहगड, विसापूर परिसरात भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९७६२३१७४८४ किंवा ९८८१७४७३४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
मोराची चिंचोली सहल
‘सहय़प्रेमी’तर्फे येत्या १९ व २० ऑक्टोबर रोजी निसर्गरम्य मोराची चिंचोली, निघोज, राळेगण सिद्धीच्या सहलीचे आयोजन केले आहे. चिंचोली गावात मोर, निघोजमध्ये रांजणखळग्यांचा भौगोलिक आविष्कार, तर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी निर्माण केलेले आदर्श गाव पाहण्यास मिळते. अधिक माहितीसाठी गौरव बोकील (९९२३४७४७५५) यांच्याशी संपर्क साधावा.
मुंबई-गोवा सायकल मोहीम
‘यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबई ते गोवा आणि पुन्हा गोवा ते मुंबई या सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेसाठीची पहिली तुकडी ७ डिसेंबरला मुंबईहून निघणार असून ती १४ डिसेंबरला पणजीत पोहोचेल, तर दुसरी तुकडी १६ डिसेंबर रोजी पणजीहून निघून ती २३ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचणार आहे. या दोन्हीही तुकडय़ा सागरी महामार्गाच्या बाजूने ५५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या मोहिमेसाठी ‘ट्रेक- ३७०० माऊंटन बाइक’ सायकल असणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९८६९०२१६२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लोणावळा- भीमाशंकर पदभ्रमण
झेप संस्थेतर्फे दिवाळीच्या सुटीत ६ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत लोणावळा ते भीमाशंकर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. लोणावळय़ातील तुंगार्ली धरणापासून या मोहिमेची सुरुवात होणार असून यामध्ये राजमाची, ढाकले किल्ला, कुंडेश्वर, कुसूर पठार, भीमाशंकर जंगल आदी स्थळांवरून पदभ्रमण केले जाणार आहे. या मोहिमेत भ्रमंती, ऐतिहासिक स्थळांना भेटी, निसर्गवाचन केले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी देवेश अभ्यंकर (८०८७४४८२९७) यांच्याशी संपर्क साधावा.
कोल्हापूर-पन्हाळा भटकंती
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान कोल्हापूर दर्शन, पन्हाळा किल्ला, कन्हेरी मठ आणि आंबोली आदी स्थळांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
‘हर की दून’चा ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे येत्या ५ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘हर की दून’ या ट्रेकचे आयोजन केले आहे. स्वर्गरोहिणी शिखराचा तळ असलेले हे ‘हर की दून’ स्थळ भटकंतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. स्वर्गरोहिणी शिखराच्या दऱ्याखोऱ्यांतून जाणारा हा मार्ग निसर्गाची अनेक रूपे दाखवतो. निसर्ग छायाचित्रकारांसाठी ही भटकंती चांगली पर्वणी आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
धनेशच्या मागावर
पूर्व हिमालयातील अरुणाचल प्रदेश निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे. या भागातील जंगलात विविध प्रकारचे धनेश दिसतात. याशिवाय लाल छातीचा पोपट, डोंगरी शाही कबूतर, लाल गालाचा शिंजीर, पल्ल्याचा मत्स्य गरुड अशा ३०० हून अधिक पक्ष्यांचा जाती येथे आढळतात. अशा या अरुणाचलमधील जंगलांतील भ्रमंतीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
रोहिडय़ावर स्वच्छता मोहीम
शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे सुरू असलेल्या दुर्ग संवर्धन कार्यातर्गत नुकतेच रोहिडा किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यामध्ये गडावर वाढलेले गवत साफ करत रस्ते स्वच्छ करण्यात आले. बांधकामांवर वाढलेली झाडेझुडपे काढण्यात आली. तसेच गडावर नवरात्रोत्सवही साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे यापुढेही गडावर संवर्धनाचे काम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
गोव्यातील अभयारण्ये
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २० ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये गोव्यातील बोंडला, महावीर अभयारण्य भेटीचे आयोजन केले आहे. या जंगल सफारीत झुआरी नदीपात्रात पक्षिनिरीक्षणही केले जाणार आहे. या जंगल भ्रमंतीत धनेश, खंडय़ा, बुलबुल, स्टॉर्क, शामा आदी पक्षी पाहण्यास मिळतात. पक्षिनिरीक्षक आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती मेजवानी ठरू शकते. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
जामनगर पक्षी निरीक्षण शिबिर
जीविधा संस्थेतर्फे स्थलांतरित पक्षी व सागरीजीवांचा अभ्यास व निरीक्षण करण्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे २३ ते २९ डिसेंबर दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे. जामनगर हे स्थलांतरित पक्ष्यांसाठीचे नंदनवन आहे. भारतात अन्य प्रदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांपैकी बहुतेक पक्षी या परिसरात हिवाळ्यात येतात. यामुळेच जामनगरपासून ५० किलोमीटरवरील ‘खेजाडिया’ हा वन्यप्रदेश पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे. या अभयारण्यात गोडय़ा पाण्याची तळी, दलदलीचा प्रदेश, खाडय़ा, खाजणवने आहेत. यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी पक्ष्यांचे दर्शन घडते. याशिवाय जामनगरजवळच भारतातील पहिले सागरी अभयारण्य आहे. ज्याद्वारे समुद्रजीवांचे निरीक्षण आणि अभ्यास करता येतो. ही भ्रमंती छायाचित्रकारांसाठीही मेजवानी ठरावी अशी आहे, तरी या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी राजीव पंडित (९४२१०१९३१३) यांच्याशी संपर्क साधावा.
बिबटय़ा सफारी
ट्वाईन आऊटडोअर्स या संस्थेच्यावतीने राजस्थानातील उदयपूरजवळच्या बेरा या बिबटय़ांच्या रहिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाच्या परिसरात १३ ते १५ डिसेंबर २०१३ दरम्यान बिबटय़ा सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसर बिबटय़ांसाठी भारतातील पहिला राखीव परिसर म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिबटय़ाच नव्हे तर हरिण, लांडगे, रानडुक्कर तसेच विविध प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात. या सफारीच्या अधिक माहितीसाठी अर्चिस सहस्रबुद्धे (९८९२१७२४६७) व लोकेश तारदाळकर (९८२०९९०३८९) यांच्याशी सपर्क साधावा.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा