किल्ले रायगड प्रदक्षिणा
‘हिरकणी ग्रुप’ संस्थेतर्फे ११ जानेवारी रोजी किल्ले रायगड प्रदक्षिणा आयोजित केली आहे. या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष असून इच्छुकांनी १० जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाचाड गावी जमावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समीर कदम (९९२०० १८४९१) यांच्याशी संपर्क साधावा.
गाळणा, लळिंग मोहीम
‘आसमंत’ संस्थेतर्फे येत्या २५-२६ जानेवारी रोजी गाळणा, कंक्राळा, लळिंग आणि लोनगीर किल्ल्यांवर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष भिडे (९७६९१५०१३०) यांच्याशी संपर्क साधावा.
नेकोरेरी लेक, धरमशाला ट्रेक
‘अ‍ॅडव्हेंचर्स हॉलिडेज’ तर्फे हिमाचल प्रदेशमधील नेकोरेरी लेक, धरमशाला येथे २७ एप्रिल आणि २५ मे अशा दोन पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. धौलाधार पर्वत रांगेत असलेले हे ठिकाण कांग्रा जिल्ह्य़ात ३३०० मीटर उंचीवर आहे. अधिक माहितीसाठी ९८६७३१८४४८ यांच्याशी संपर्क साधावा.
सांधण व्हॅली भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या १७, १८ जानेवारी रोजी सांधण व्हॅली भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटेल! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com