29 January 2020

News Flash

ट्रेक डायरी : बांधवगड दर्शन

‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ५ ते ९ मे दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे.

| February 19, 2015 02:41 am

‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ५ ते ९ मे दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

मनाली, चंद्रखाणी खिंड साहस शिबिर
‘माउंटन हायकर्स’तर्फे येत्या २ ते ११ मे दरम्यान मनाली तसेच १६ ते २४ मे दरम्यान चंद्रखाणी खिंड साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८) यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबईतील किल्ले
मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे? मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे येत्या रविवारी (२२ फेब्र)  मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफ रीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा  निलाक्षी पाटील (९८१९१०६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

सांधण व्हॅली भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या २८  फेब्रुवारी, १ मार्च रोजी सांधण व्हॅली भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे २२ ते २५ एप्रिल दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. संपर्क : अमित भुस्कुटे – ९८१९२१५१२७

मुलांसाठी जंगल सफारी

‘निसर्ग सोबती’तर्फे १० ते २० वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी सुटीत २४ ते २७ एप्रिल दरम्यान ताडोबा आणि ५ ते ९ मे दरम्यान बांधवगड जंगल सफारीचे आयोजन केले आहे.  संपर्क : अभय जोशी – ९९३०५६१६६७

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com

First Published on February 19, 2015 2:41 am

Web Title: trek diary 58
टॅग Trek Diary
Next Stories
1 नरनाळा, गावीलगडची दुर्गभ्रमंती
2 ‘एव्हरेस्ट’वर चर्चा
3 परिसंवाद, मुलाखत, दुर्गदर्शन, प्रदर्शन, स्पर्धा
Just Now!
X