बांधवगड दर्शन
‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २ ते ६ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

नगर शहर अभ्यास सहल
अहमदनगर शहर म्हटले, की इतिहासातील निजामशाहीची आठवण होते. या शहराचा संस्थापक अहमद निजामशहाचा मकबरा आणि तालिकोटच्या लढाईच्या परिसरात येत्या शनिवारी (१८ एप्रिल) ‘सिटी वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सर्वासाठी मोफत खुला आहे. अधिक माहितीसाठी भूषण देशमुख (९८८१३३७७७५) यांच्याशी संपर्क साधावा.

निसर्ग साहस शिबिर
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या १ ते २ मे
दरम्यान ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी निसर्ग साहस शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये कोस्टल ट्रेक, जंगल ट्रेक, बोटिंग, वाळूच्या
टेकडीवर चढाई आदी साहसी
उपक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १७ ते २० जून दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com