ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. या जंगलात बांबू, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ आदी दुर्मिळ वनस्पतीही आहेत. ४५ प्रकारचे सस्तन प्राणी, २८० प्रकारचे पक्षी, ९४ प्रकारची फुलपाखरे, २६ प्रकारचे कोळी आणि ३० सरपटणारे प्राणी, अशी ही या जंगलाची संपत्ती आहे. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १५ ते १९ मे या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
हर की दून मोहीम
‘हर की दून’ हा गढवाल हिमालयातील एक वैशिष्टय़पूर्ण ट्रेक आहे. स्वर्ग रोहिणी शिखराच्या पायथ्याशी घेऊन जाणारा हा ट्रेक हिमालयाचे सर्वाग दर्शन घडवतो. बर्फाच्छादित शिखरे आणि घनदाट जंगलांनी हा प्रदेश नटलेला आहे. या भागातील वन्यसृष्टी पाहण्यासारखी आहे. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. अशा या ‘हर की दून’ मोहीमेचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे येत्या २८ एप्रिल, ९ मे आणि १८ मे पासून आयोजन केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे जून महिन्यात विविध जंगलांतील भ्रमंतीचे आयोजन केले आहे. यामध्ये कान्हा (५ ते ८ जून), रणथंबोर (१२ ते १५ जून),  बांधवगड (१९ ते २२ जून) आणि ताडोबा (२६ ते २९ जून) या मोहिमांचा समावेश आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.