ताडोबा जंगल सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १७ ते २० जून  दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.
जंगल भ्रमंती
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २६ ते २९ जून दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे.  अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७/६८) यांच्याशी संपर्क साधावा.
रूपीन पास ट्रेक
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्या दरम्यान एका खोऱ्यातून जाणारा हा एक निसर्गरम्य ट्रेक. साधारण १५,२५० फूट उंचीवरून जाणाऱ्या या ट्रेकमध्ये हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचे खूप सुंदर दर्शन घडते. साहस, निसर्ग आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हा ट्रेक वेगळे आकर्षण ठरू शकतो. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ४ जून, १४ जून आणि २७ जूनपासून या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केलेले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

 ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com