धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com

ताडोबा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २६ ते २९ जून दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या
सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे अनेक दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

रूपीन पास ट्रेक
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्या दरम्यान एका खोऱ्यातून जाणारा हा एक निसर्गरम्य ट्रेक. साधारण १५,२५० फूट उंचीवरून जाणाऱ्या या ट्रेकमध्ये हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचे खूप सुंदर दर्शन घडते. साहस, निसर्ग आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हा ट्रेक वेगळे आकर्षण ठरू शकतो. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ४ जून, १४ जून आणि २७ जूनपासून या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केलेले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

रणथंबोर भ्रमंती
‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या २३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. हे जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे जंगल वसलेले आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. ज्यांना या जंगल भ्रमंतीत सहभागी व्हायचे आहे अशा इच्छुकांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.