News Flash

ट्रेकइट डायरी

ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर,

| July 30, 2015 12:25 pm

ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबर येथे बिबळ्या, मगर, अस्वल, रानकुत्रे, हरीण, सांबर असे अनेक प्राणी पाहण्यास मिळतात. स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीमध्ये पाहण्यास मिळेल. अधिक माहितीसाठी
संपर्क – राधिका फडके – ९८३३०२६९६९,
अर्चिस सहस्रबुद्धे झ्र् ९८९२१७२४६७
बांधवगड सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान मध्यप्रदेशातील बांधवगड येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिहरगड भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या २ ऑगस्ट रोजी हरिहरगड भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध १० धबधब्यांच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर, नापणे, मणचे, सावडाव, सैतवडा, आंबोली, कावळेशेत आणि नांगरतास आदी धबधब्यांचा या सहलीत समावेश आहे. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती विशेष आकर्षण ठरणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:25 pm

Web Title: trek diary 75
Next Stories
1 पारगडची मोहीम
2 सागरा ची साद
3 भटक्यांची ‘घोडदौड’
Just Now!
X