29 January 2020

News Flash

ट्रेक डायरी

पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे.

| July 16, 2015 12:08 pm

कास पठार – सज्जनगड
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण
भरारी गिर्यारोहण संस्थेतर्फे येत्या ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी अंकुश (९०२९९२४५४३/९५९४४८९२९२) यांच्याशी संपर्क साधावा.

सांधण व्हॅली भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या १९ जुलै रोजी सांधण व्हॅली येथे ‘वॉटर रॅपलिंग’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

राजमाची पदभ्रमण
‘माऊंटन हायकर्स’ तर्फे १८-१९ जुलै रोजी राजमाची येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८), वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी
संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com

First Published on July 16, 2015 12:08 pm

Web Title: trek diary 76
टॅग Trekking
Next Stories
1 पावसात भटका, पण!
2 भीमाशंकरची जंगलवाट
3 वल्लभगडची भटकंती
Just Now!
X