ट्रेक डायरी: धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या १६ ते १९ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध १० धबधब्यांच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर, नापणे, मणचे, सावडाव, सैतवडा, आंबोली, कावळेशेत आणि नांगरतास आदी धबधब्यांच्या या सहलीत समावेश आहे. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती विशेष आकर्षण ठरणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण
‘शिवशौर्य ट्रेकर्स’ तर्फे येत्या ३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावरून निघून पावनखिंडमार्गे विशाळगडावर पोहोचले होते. या वेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत आपल्या प्राणाची आहुती देत महाराजांची वाट निर्धोक केली होती. यंदा या रणसंग्रामास ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतिप्रीत्यर्थ बरोबर या दिवशी पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम शिवाजीमहाराज ज्या वाटेने गेली त्याच वाटेने जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अमित (९३२०७५५५३९), संघमित्रा (९८१९६६२२५४) किंवा गुरुनाथ (९८६९०८४९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

लडाख सफर
लडाख हा निसर्गाचा आगळा आविष्कार आहे. अतिउंचीवरील कमालीच्या थंडगार तापमानाची शुष्क वाळवंटे, खडतर डोंगररांगांचे भीषण-गूढ सौंदर्य, उतार-खिंडी, जगातील सर्वात उंचीवरील रस्ता, खिंड, उंचीवरील पेंगॉग सारखे तलाव, वन्यजीवन, निसर्ग या साऱ्यांनी लेह-लडाखचा हा प्रदेश वैशिष्टय़पूर्ण मानला जातो. या प्रदेशाचे हे अभ्यासू दर्शन घेण्यासाठी ७ ते २१ ऑगस्ट ‘जीविधा’तर्फे सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी राजीव पंडित (९४२१०१९३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

भीमाशंकर भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या ५ जुलै रोजी भीमाशंकर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com