चादर ट्रेक
लेह-लडाख परिसरातील चादर हा गिर्यारोहण जगातील एक प्रसिद्ध ट्रेक आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अशा या हिमालयातील वाटेवरच्या भटकंतीचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ७ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

पेंच जंगल सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे ४ ते ६ डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील पेंच येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात बिबटय़ा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

रायगड दर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या अभ्यास सहलीचे ‘होरायझन’तर्फे ११ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत अभ्यासकांच्या नजरेतून रायगडाच्या इतिहासाचे, तिथल्या स्थापत्याचे दर्शन घडवले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

हरिश्चंद्रगड पदभ्रमण
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या ३ – ४ ऑक्टोबर
रोजी हरिश्चंद्रगडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य (७७२००८०९१८), प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. या जंगलात बांबू, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ आदी दुर्मिळ वनस्पतीही आहेत. ४५ प्रकारचे सस्तन प्राणी, २८० प्रकारचे पक्षी, ९४ प्रकारची फुलपाखरे, २६ प्रकारचे कोळी आणि ३० सरपटणारे प्राणी अशी ही या जंगलाची संपत्ती आहे. अशा या जंगल अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. या सहलीमध्ये ताडोबा जंगलाबरोबर आनंदवन या प्रकल्पालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com