ताडोबा सफारी
ट्विीन आऊटडोअर संस्थेतर्फे १४ ते १६ डिसेंबर दरम्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि २२ ते २४ डिसेंबर दरम्यान नागझिरा अभयारण्यामध्ये जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्राणी आणि स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी निसर्यप्रेमींना या सफरीत पाहता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – आर्चिस सहस्त्रबुद्धे ९८९२१७२४६७, विद्यानंद जोशी – ९८३३४६४०३३

दुर्ग अभ्यासवर्ग
भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १० ते १९ डिसेंबरदरम्यान दुर्ग अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात दुर्गाचा इतिहास, सहय़ाद्री आणि दुर्ग, शिवकालीन दुर्ग व्यवस्था, जीपीएस मॅपिंग, उत्खनन, दुर्गावरील वनस्पतिजीवन आदी विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. अधिक माहितीसाठी ९८२२१०९३६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रणथंबोर सफारी
‘निसर्ग सोबती’ संस्थेच्या वतीने १२ ते १६ एप्रिल २०१३ दरम्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात वन्य जीव निरीक्षण सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्हय़ातील अरवली पर्वत आणि विंध्य पर्वतामध्ये हे राष्ट्रीय उद्यान असून, १९८१ साली रणथंबोर हे राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. जंगलाची व्याप्ती ३९२ चौ.कि.मी. कोअर एरिया आणि ९४२ चौ.कि.मी. बफर एरिया आहे. या अभयारण्यात जवळपास २५ वाघ, ४० बिबळे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर (बार्किंग डीअर) आदी प्राण्यांचा रहिवास आहे. तर इतर दुर्मिळ प्राण्यांचे दर्शनही सफारीदरम्यान होत असते. प्राण्यांप्रमाणे या ठिकाणी २६४ प्रकारचे पक्षी आढळतात, तर स्थलांतरित पक्ष्यांची ये-जा येथे सुरू असते. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७, ९९३०५६१६६८) यांच्याशी संपर्क करा.

पक्षिशास्त्र अभ्यासक्रम
इला फाऊंडेशन व आबासाहेब गरवारे विद्यालयाच्या वतीने पुण्यात येत्या १० डिसेंबरपासून पक्षिशास्त्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन महिने चालणाऱ्या या अभ्यासक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने तसेच पक्षिनिरीक्षण स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९७०१६१७९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.