‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. – abhijit.belhekar@expressindia.com

कास पठार – सज्जनगड

पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. या वेळी कुणी फुलांच्या अभ्यासासाठी, कुणी छायाचित्रणासाठी तर कुणी निव्वळ त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी कासची वाट पकडते. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २० आणि २१ सप्टेंबरदरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा हेमलकसा भ्रमंती
ताडोबा हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून प्रजातींचे पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘वसुंधरा’तर्फे आयोजन केले आहे. १२ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत जाणाऱ्या या सहलीमध्ये आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ आणि पवनार आदी प्रकल्पांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर आदी धबधब्यांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.