18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

ट्रेक डायरी ताडोबा सफारी

‘निसर्ग सोबती’ संस्थेच्या वतीने महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी फक्त महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या

प्रतिनिधि | Updated: November 27, 2012 11:21 AM

‘निसर्ग सोबती’ संस्थेच्या वतीने महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी फक्त महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

पक्षिनिरीक्षण
‘इनसर्च आऊटडोअर्स’तर्फे २ डिसेंबर रोजी भिगवण, मयूरेश्वर येथे पक्षिनिरीक्षण सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०- २५४४३०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सायकल मोहीम
यूथ होस्टेल ऑफ  इंडियाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे यंदाही मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई अशा दोन तुकडय़ांमध्ये सायकल मोहिमेचे आयोजन केलेले आहे. यातील पहिली तुकडी ८ डिसेंबर रोजी मुंबईतून निघणार असून ती १५ डिसेंबरला पणजीत पोहोचणार आहे. तर दुसरी तुकडी १६ डिसेंबर रोजी पणजीतून निघणार असून ती २३ डिसेंबर रोजी मंबईत पोहोचणार आहे. ही मोहिम सागरी महामार्गावरून होणार असून याचा प्रवास प्रत्येकी ५५० किलोमीटरचा होणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ०२२- २४१८३७५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण सहल
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या शनिवारी १ ते २ डिसेंबर रोजी जयगड किल्ला, गणपतीपुळे, रत्नागिरी किल्ला तसेच ७ ते ९ डिसेंबर रोजी मालवण, सिंधुदुर्गची सहल आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
‘टकमक’वर रॅपलिंग
पिनॅकल क्लब आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर दरम्यान रायगडावरील टकमक कडय़ावर ‘रॅपलिंग’चे आयोजन केले आहे. गिर्यारोहणातील उच्च दर्जाच्या साधनांच्या मदतीने एखादा कडा उतरणे म्हणजे ‘रॅपलिंग’. पिनॅकल क्लबच्या वतीने रायगडाच्या टकमक कडय़ावर हा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. यातील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. तसेच अशांसाठी २ व ९ डिसेंबर रोजी कान्हेरी लेण्यांच्या परिसरात सराव शिबिराचेही आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी शंतनू (९९२०४४७४४८), शशिकांत (९८९२१५४२४३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
बांधवगड दर्शन
निसर्ग टूर्सतर्फे येत्या  १४ ते २० फेब्रुवारी २०१३ दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घालत. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाट आणि खजुराहो येथील प्राचीन मंदिरांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.  

First Published on November 27, 2012 11:21 am

Web Title: trek it trek diary tadoba tour