‘एसपीआर’तर्फे येत्या १५ जून रोजी कोथळीगडावर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

स्टोक कांगरी मोहीम
स्टोक कांगरी हे लेह परिसरातील एक महत्त्वाचे हिमशिखर आहे. ‘विशाल अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे या शिखरावर येत्या १५ ते २४ जुलै दरम्यान मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विशाल कडूसकर (९९२१५१९७५०) यांच्याशी संपर्क साधावा.
उंच गगनाला भिडणारी गिरीशिखरे, आशिया खंडातील सर्वात मोठय़ा पँगाँग तलावाचे मन मोहून टाकणारे निळेशार पाणी आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या, जगातील सर्वात उंचीवरचा वाहनांचा रस्ता, जगातील सर्वात उंचीवरची पठारे आणि वाळूच्या टेकडय़ा ही सारी
निसर्गनवले लेह आणि लडाखच्या भूमीत खुणावतात.
या स्वर्गभूमीच्या भटकंतीचे १४ ते २२ ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तेजस (९६६४६४१२५२) किंवा प्रसाद (९९८७१७५२६१) यांच्याशी संपर्क साधावा.

तिकोना पदभ्रमण
‘माऊंटन हायकर्स’ तर्फे १५ जून रोजी तिकोना किल्ल्यावर पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी
आदित्य फडतरे (९७३०८९५६७८), वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.