लोणावळय़ाच्या दक्षिणेला भांबुर्डे गावापर्यंत एक वाट गेली आहे. या भांबुर्डे गावाच्या पाठीमागेच घनगडावरून दिसणारा तेलबैला दुर्गाच्या भिंतींचा हा आविष्कार! भूशास्त्रीय भाषेत ‘डाइक’ पद्धतीच्या या भिंती. सह्य़ाद्रीच्या ऐन घाट माथ्यावरचा हा दुर्गम दुर्ग! या भिंतीची समुद्रसपाटीपासून उंची आहे तब्बल ३३२२ फूट! गिर्यारोहकांना सतत आव्हान देणाऱ्या या भिंती म्हणजे आमच्या सह्य़ाद्रीचे खरेखुरे भूषण!