03 March 2021

News Flash

उपक्रम : साल्हेरवर विजयदिन

साल्हेर, महाराष्ट्रातील गडकोटांमधील सर्वात उंच दुर्गशिखर. उंची ५१४० फूट. छत्रपती शिवरायांनी बागलाण मोहिमेंतर्गत ५ जानेवारी १६७१ रोजी हा किल्लाजिंकून घेतला.

| January 22, 2015 01:54 am

tr04
साल्हेर, महाराष्ट्रातील गडकोटांमधील सर्वात उंच दुर्गशिखर. उंची ५१४० फूट. छत्रपती शिवरायांनी बागलाण मोहिमेंतर्गत ५ जानेवारी १६७१ रोजी हा किल्लाजिंकून घेतला. या दिवसाचे महत्त्व जाणून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने
साल्हेर किल्ल्यावर नुकताच विजयदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने गडावर साफसफाई करण्यात आली. मंदिरे, स्मृतिस्थळांची सफाई करण्यात आली. अवशेषांभोवती वाढलेली झुडपे काढण्यात आली. तट-बुरुज-दरवाजांना फुलांची तोरणे बांधण्यात आली. भगव्या पताका लावण्यात आल्या. या उपक्रमात अनेक दुर्गप्रेमी सहभागी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:54 am

Web Title: victory day celebrated on salher hill
Next Stories
1 ट्रेक डायरी : मुंबईतील किल्ले
2 राईतला कनकेश्वर!
3 कळसूबाई वर ‘त्यांची’चढाई
Just Now!
X