विजयदुर्गमध्ये सांस्कृतिक महोत्सव

दुर्गाची, दुर्गाच्या परिसरातील समाज आणि संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुगुर्ग जिल्ह्य़ातील विजयदुर्ग किल्ल्यावर येत्या २१, २२ आणि २८ व २९ डिसेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुर्गाची, दुर्गाच्या परिसरातील समाज आणि संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुगुर्ग जिल्ह्य़ातील विजयदुर्ग किल्ल्यावर येत्या २१, २२ आणि २८ व २९ डिसेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘विजयदुर्ग’ हा छत्रपती शिवरायांच्या अभेद्य आरमारातील एक महत्त्वाचा जलदुर्ग! राजा भोजची निर्मिती, शिवरायांनी त्याला दिलेले तिहेरी तटबंदीचे बुलंद रूप, पुढे मराठय़ांच्या आरमाराचे बनलेले मुख्य केंद्र, जंजिऱ्याच्या सिद्दीपासून ते इंग्रज, डच, पोर्तुगीजांसारख्या अनेक विदेशी शक्तींचे इथेच झालेले पराभव,  हेलियमचा शोध..अशा अनेक घटना-प्रसंगांनी हा जलदुर्ग भारावलेला आहे. अशा या ‘विजयदुर्ग’च्या भूमीवर या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दुर्ग दर्शन, विजयदुर्ग परिसरातील पर्यटन स्थळांची सफर, इतिहासाची ओळख, सामुद्रीजीवनाची सफर, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही या महोत्सवाची वैशिष्टय़े आहेत. यामध्ये अभ्यासकांच्या नजरेतून विजयदुर्ग किल्ला, येथील रामेश्वर मंदिर, गिर्ये बिच, दामले मळा, नौकायनद्वारे पुरातन नैसर्गिक गोदी आणि वाघोटन खाडीचे दर्शन घडविले जाणार आहे. याचबरोबर नौकानयन,   डॉल्फीन     दर्शन, कोकणी खाद्य संस्कृती, कोकणी संस्कृतीतील ढोल-ताशांचे खेळ, गोफ नृत्य, गजनृत्य, कापड खेळे, दशावतार, मालवणी नाटय़छटा हे या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे.
या किल्ल्यावरच २००५ च्या डिसेंबरमध्ये समितीच्या वतीने किल्ले विजयदुर्गच्या अष्टशताब्दी सोहळा आणि चालू वर्षी जानेवारीत तिसरे दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमातून हजारो पर्यटकांचे या जलदुर्गाशी आणि कोकणी संस्कृतीशी नाते जुळलेले आहे. यातील पुढचे पाऊल म्हणून समितीच्या वतीने यंदा डिसेंबरमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी http://www.fortsindhudurg.com या संकेतस्थळावर किंवा बाळा कदम (९४२०३०८१००) किंवा प्रसाद देवधर (९४२३०५१७१४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cultural festival in vijaydurga fort