कळसुबाई! महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’! उंची १६४८ मीटर किंवा ५४३१ फूट. जातीच्या प्रत्येक भटक्यांना हे सर्वोच्च शिखर चढण्याचा, त्याच्या माथ्याला स्पर्श करण्याची इच्छा असते. पण त्यातील आव्हानामुळे साऱ्यांनाच ही चढाई शक्य होत नाही. पण मग अशा या उत्तुंग शिखरावर जाण्याचा चंग जर अपंगांनी बांधला तर! ऐकून धक्का बसला नां! होय, मोहीम अशी आहे. अपंगांची अपंगांनी आखलेली ही मोहीम आणि ती देखील थेट महाराष्ट्राच्या या ‘एव्हरेस्ट’वर. प्रहार संस्थेच्यावतीने येत्या ३१ डिसेंबर रोजी या मोहिमेचे आयोजन केले आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शिवाजी गाडे (९७३०८९२७५०) यांच्याशी संपर्क साधावा.