पेंच जंगल सफारी

पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प

पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प. प्रियदर्शनी व्याघ्र प्रकल्प असे नाव असलेल्या या जंगलास इथून वाहणाऱ्या पेंच नदीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्प असेही म्हणतात. या जंगलाची व्याप्ती ७५८ चौरस किलोमीटरची आहे. या जंगलात ऐन, हळदु, तेंदू, हिरडा, अमलताश अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध जंगल आहे. या जंगलात वाघांशिवाय बिबटय़ा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. ‘निसर्ग टूर्स’च्या वतीने तज्ज्ञांच्या मदतीने २ ते ४ मार्च २०१६ दरम्यान मध्य प्रदेशातील या जंगल सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

वासोटा मोहीम
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या १९ आणि २० डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्य़ातील वनदुर्ग वासोटा किल्ल्याच्या मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.
रायगड परिक्रमा
‘हिरकणी ग्रुप’तर्फे येत्या २ ते ३ जानेवारी दरम्यान शिवतीर्थ रायगड परिक्रमेचे आयोजन केले आहे. संस्थेतर्फे गेली १६ वर्षे याचे आयोजन केले जात आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी समीर कदम (९९२००१८४९१) यांच्याशी संपर्क साधावा.

महिलांसाठी ताडोबा जंगल भ्रमंती
आठ मार्च हा सर्वत्र ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून ‘निसर्ग सोबती’ तर्फे येत्या ९ ते ११ मार्च दरम्यान खास महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सहलीचे आयोजन केले आहे. ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. या जंगलातील तलावाकाठी पहुडलेल्या मगरीदेखील दिसतात. तरी या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा. ‘शौर्य हॉलिडे’तर्फेही याच कालावधीत खास महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अश्विनी आठवले (९०२९५३५२०९) यांच्याशी संपर्क साधावा.

चादर ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ७ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान लेह-लडाख परिसरातील चादर ट्रेकचे आयोजन केले आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

उजनी पक्षी निरीक्षण सहल
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २० डिसेंबर रोजी उजनी धरणक्षेत्रातील भिगवण येथे पक्षी निरीक्षण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी जलाशयावर विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येतात. अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jungle safari of pench

ताज्या बातम्या