पाऊसकाळी फि रण्याच्या स्थळांमध्ये कर्जतजवळचा कोथळीगडही भटक्यांच्या विश्वात प्रसिद्ध आहे. गडाची रचना, तिथला भुयारीमार्ग, भोवतीचा निसर्ग हे सारे मन व्यापून टाकते.
पाऊस म्हटल्यावर त्याची विविध रुपे नजरेसमोर तरळायला लागतात. काळंभोर झालेलं आकाश, कधीही कोसळू शकणारा पाऊस, धुवाधार कोसळणारा पाऊस, श्रावणातला रिमझिमणारा सोनेरी रेशमी पाऊस. दाट धुक्याची चादर ओढणारे कुंद वातावरण, तर कधी ढगात लपून जाणारा आसमंत. अशा कोणत्याही वातावरणात प्रसन्न करणारे गिरिपर्यटन करावयाचे असेल तर कर्जत (जि. रायगड) जवळच्या कोथळीगड अथवा पेठच्या किल्ल्याला पर्याय नाही. जून अखेर ते सप्टेंबर अखेर या काळात कधीही जायला हरकत नाही. निराश पदरात पडणारच नाही. पुणे वा मुंबई दोन्ही ठिकाणाहून हा किल्ला पाहून एका दिवसात परत येता येते.
पुण्याहून सकाळी निघणारी सिंहगड एक्स्प्रेस पकडून कर्जतला उतरावे. मुंबईहून आल्यास नेरळ येथे उतरू शकता. कर्जतहून खांडस बस पकडून अंबिवली येथेच सकाळची पोटपूजा करून घ्यायची आणि पेठ गावाकडे घाटाने कूच करावे. आंबिवली ते पेठ हे अंतर ३ किलोमीटर आहे. रस्ता सुस्थितीत असेल आणि स्वत:चे वाहन असेल तर ही पदयात्रा वाचू शकते. पेठ हे डोंगरमाथ्यावर वसलेले एक चिमुकले देखणे खेडे! खेडे कसले, एक वाडीच आहे. ढगात लपून बसलेल्या कोथळी गडाच्या पायथ्याशी चिकटून बसलेलं हे गाव.
गड साधारणत: पर्वती एवढा किंवा थोडा कमीच असेल. चढणही अवघड नाही. चढून गेल्यावर आपण पोहोचतो कडय़ातील देवीच्या देवळासमोर. हे देऊळ एका भल्यामोठय़ा गुहेत आहे. या देवळाशेजारी आहे एक स्वच्छ, चवदार पाण्याचे टाके. हे टाके उन्हाळ्यातही तीन महिने पेठ गावाला पाणी पुरवते आणि तेथेच एक आश्चर्य दडले आहे. प्रथमत: आपल्या लक्षातच येत नाही. या टाक्यावरून एक दगडी भुयारी जिना आपल्याला थेट डोंगर माथ्यावर घेऊन जातो. येथे कर्नाळा किल्ल्यासारखा एक अंगठय़ाच्या आकाराचा सुळका आहे. याच्या पोटात एखाद्या मिनारातील जिन्याप्रमाणे गोल फिरत जाणारा भुयारी मार्ग आपल्याला सुळक्याच्या माथ्यावर घेऊन जातो. सुळक्याच्या वर छोटीशी सपाटी आहे. येथे वाडय़ाचे जोते दिसते. एक छोटेसे तळे आहे आणि येथे आपल्याला पावसाळ्यात आढळतो पिवळाजर्द रानसोनटक्का. अधूनमधून ढग विरळ झाल्यास आपल्याला भीमाशंकर, कलावंतीण (पदरगड), ढाकची बहिरी, राजमाची, माथेरान इत्यादी गिरिशिखरांचे दर्शन होते. गुहेच्या आधी आपल्याला गड प्रदक्षिणा करता येते, पण कोणी तज्ज्ञ माहितगार असल्याशिवाय या वाटेला जाऊ नका आणि पावसाळ्यात तर नकोच. पावसाळय़ात हा सारा परिसर हिरवागार झालेला असतो. भोवतीने असंख्य जलधारा वाहत असतात. मध्येच ढगांचे आच्छादन यावर तयार होते. ही ओली अनुभूती घेतच गड उतरू लागायचे.

Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?