उपक्रम
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळातर्फे दरवर्षी एखाद्या किल्ल्याच्या परिसरात दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा हे संमेलन सिंहगड किल्ल्यावर होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी ‘सह्य़ाद्रीचे अंतरंग’ हा विषय ठरवण्यात आला असून यामध्ये दुर्गस्थापत्य आणि सह्य़ाद्रीचे निसर्गचित्र या विषयांवरील छायाचित्रे मागविण्यात येत आहेत. स्पर्धेसाठी स्वत: काढलेले छायाचित्र पाठवावे. ते वरील विषयाला अनुसरून असावे. छायाचित्रासोबत त्या विषयाची थोडक्यात माहिती द्यावी. संबंधित छायाचित्रावर कुठल्याही प्रकारचे लेखन, नाव, वॉटर मार्क, चिन्ह किंवा अन्य सजावट केलेली नसावी. कुठल्याही स्पर्धकास वरील विषयातील कमाल तीन छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील, पण त्याची प्रवेशिका मात्र एकच ग्राह्य़ धरण्यात येईल. संबंधित छायाचित्रे अन्य उपक्रमात वापरण्याचा मंडळास हक्क राहील. स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रांना संमेलनात पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. तसेच स्पर्धेतील निवडक पन्नास छायाचित्रांचे संमेलनस्थळी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपली छायाचित्रे वैयक्तिक माहितीसह १५ जानेवारीपूर्वी fotocirclenashik@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी संजय अमृतकर (९९६०० १०००९) यांच्याशी संपर्क साधावा.