किल्ल्यांची प्राथमिक गरज म्हणजे पाण्याची स्वयंपूर्णता. वेळप्रसंगी वर्ष वर्ष गड लढवावा लागला तरीही गडावर पुरेसे पाणी हवे. यासाठी गडांवर नैसर्गिक टाकी़ विहिरी, बंधारे, धरणे यांची योजना केलेली आहे.
तसेच पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याची योग्य साठवण करून ते वर्षभर पुरविण्याचे योग्य नियोजन केलेले आढळते. भटकंती दरम्यान दिसलेल्या काही अनोख्या पाणवठय़ांची आपणास ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.
गजाननाच्या पाली क्षेत्राची पाठराखण करणाऱ्या सरसगडाच्या अत्युच्च माथ्यावर आहे एक चिमुकले पठार. या पठारावर आहे एक सुंदर इवलेसे तळे. नेहमीच लालचुटूक कमळांनी फुललेलं. काठावरच एक छोटसं केदारेश्वर शिवमंदिर. साक्षात काव्यच अवतरल्यागत. या तळ्याच्या थोडसं खालच्या बाजूस एका गुहेत दडलं आहे एक भले थोरले स्वच्छ, थंडगार पाण्याचं टाकं. हे टाकं उन्हाळ्यात खालच्या वाडीची पाण्याची गरज भागवते. असाच छोटासा सुंदर जलाशय आहे कोथळीगडाच्या सुळक्यावर! खालच्या गुहेतील देवी शेजारचे हे पाण्याचे टाके पेठ गावाची पाण्याची गरज संपूर्ण उन्हाळाभर भागवते.

सातारा परिसरातील नांदगिरी गडावरील गुहेत एक आश्चर्य दडलेले आहे. या अंधाऱ्या गुहेतून कंबरभर पाण्यातून सुमारे १५० मीटर वाटचाल केल्यावर आपल्याला दर्शन देतात भगवान पाश्र्वनाथ आणि गुरुदेवदत्त. हरिश्चंद्रगडावरही पाण्याची टाकी़, तलाव आहेतच पण येथे एका गुहेत शिवलिंग आह़े सभोवती पाणीच पाणी आहे. त्याला प्रदक्षिणा मात्र कमरेएवढय़ा पाण्यातून घालावी लागते.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
house burglary nashik marathi news
नाशिक: वावीत घरफोडी करणारी टोळी ताब्यात, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
satpura range marathi news, bhongarya bazar marathi news
सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!

राजधानी रायगडावरही गंगासागरसारखे तलाव आणि अनेक टाकी आहेत. सिंहगडावरील देवटाके त्याच्या अमृतमधूर पाण्यासाठी प्रसिध्दच आहे. साक्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनीही त्याची महती गाईली होती. देवटाक्यासारखेच पण प्रचंड मोठे खोदीव टाके प्रचितगडावर आह़े एकतर हा किल्ला चहूबाजूने आकाशात घुसलेला आणि जवळजवळ माथ्यावरच आहे. हे टाके सहज न सापडणारे. आत पुष्कळ खांब असणाऱ्या या टाक्यात एक राखीव टाकं आह़े जर काही दगाफटका होऊन पाण्यात जहर मिसळले गेले तरीही या राखीव टाक्यास त्याचा उपद्रव होणार नाही. हे टाके संपूर्ण आच्छादित असल्याने शेकडो वर्षे काहीही निगराणी नसतानाही याचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे.
साल्हेर, अलंग, कुलंग या गडांवर बंधारे घालून धरणेच बांधली आहेत आणि अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. ही यंत्रणा आजही कार्यरत आहे. या गडांवर पाण्याची टाकीही उल्लेखनीय आहेत. मुल्हेर किल्ल्याच्या माचीवर एक सुरेख दगडी बांधणीचा तलाव आहे आणि त्यामध्ये आहे एक देखणे गणेशमंदिर. सालोटा किल्ल्याची चढण फार अवघड. चढता चढता घसा कोरडा पडतो. सोबतचे पाणी संपत़े पाणी मिळणे अशक्य वाटत असते आणि माथ्यावर अचानक थंडगार रुचकर पाण्याचे टाके स्वागत करते.

अहमदनगरजवळ मांजरसुबा नावाचा एक चिमुकला थोडय़ा उंचीचा डोंगरी किल्ला आहे. येथे काही लढाया अथवा महत्त्वाच्या घटना घडल्याची नोंद नाही. बहुतेक हे विलास स्थळ असावे. येथे सुंदर इमारतींच्या अवशेषांसोबत हमामखाना आणि जलतरण तलावाचेही अवशेष आहेत. गंमत म्हणजे नगरसारख्या दुष्काळी प्रदेशातही येथील टाक्यांना आजही तुडुंब पाणी आहे. गाळणा किल्ल्यावरील हमामखान्यामध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाण्यासाठीचे पाईप आजही दिसतात. मनमाडनजिक असलेल्या अंकाई किल्ल्यावरील राजप्रासादाच्या मध्यभागी एक बंदिस्त चौरस दगडी बांधणीचा देखणा तलाव आह़े. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची योजना आहे. जनान्यासाठी कपडे बदलण्याची व्यवस्थासुध्दा आहे. येथे सांडपाण्यासाठी भूमिगत पाईपलाईन पण पाहता येते, पण आता हा तलाव कोरडा आहे.

सिंधुदुर्ग, जंजीरा, कुलाबा या सारख्या चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या जलदुर्गांवरही गोड पाण्याचे जलाशय आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षांंपूर्वी अलिबाग शहरातील काही कुटुंबे गावातील विहिरींचे मचूळ पाणी न पिता कुलाबा किल्ल्यातील विहिरीचे गोड पाणी पीत असत. याशिवाय अहमदनगर, नळदुर्ग, बिदर इत्यादी अनेक भुईकोट किल्ल्यांमध्येही पाण्याचे अनेक चमत्कार केलेले आढळतात. मग पडता आहात ना बाहेर. अशाच अनेक गोष्टी तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत.