नागझिरा जंगल भ्रमंती
tek03 ताडोबाबरोबरच नागझीरा हे देखील महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २०० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक
trek04‘एव्हरेस्ट बेस कॅम्प – चो ला पास-गोकयो ’ हा जगातील सर्व भटक्यांचे स्वप्न असलेला ट्रेक. एव्हरेस्ट चढता नाही आले, तरी आयुष्यात एकदा तरी या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडावे ही तमाम गिरिप्रेमींची इच्छा असते. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकमध्ये ही इच्छा पूर्ण होते. तसेच या ट्रेकमधून या सर्वोच्च शिखराच्या सान्निध्यात पदभ्रमंतीचा आनंदही मिळतो. एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या या पदभ्रमण मोहिमेत विविध हिमशिखरांचे दर्शन घडते. हिमालयाची जवळून अनुभूती, उंचीवरील पदभ्रमण मोहिमेचा अनुभव गाठीशी येतो. या पदभ्रमणामध्येच जगप्रसिद्ध सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाचेही दर्शन घडते. अशा या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २५ एप्रिल ते १६ मे २०१६ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

शिवनेरी, चावंड, हडसर पदभ्रमण
जिज्ञासा ट्रस्टतर्फे येत्या १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, हडसर आणि चावंड किल्ल्यांच्या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२१४२८२४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

एलिफंटा अभ्यास सहल

‘होरायझन’तर्फे येत्या ८ सप्टेंबर रोजी एलिफंटा येथील शैव गुहांच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.

कुआरी पास ट्रेक

हिमालयातील अनेक प्रसिद्ध ट्रेकपैकी एक असा हा कुआरी पास ट्रेक आहे. ‘एसपीआर’तर्फे येत्या २४ डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१६ दरम्यान या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

नाणेघाट आणि जीवधन मोहीम

‘बाण हायकर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी नाणेघाट आणि जीवधन मोहिमेचे आयोजन केले आहे. यामध्ये या दोन्ही स्थळांना भेटी तसेच नाणाच्या अंगठय़ावर रॅपलिंगच्या उपक्रमाचेही आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२१३२५५४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

निसर्ग शिबिर

ब्ल्यू व्हेल नेचर असोसिएशनतर्फे १४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान १२ ते २१ वयोगटातील मुलांसाठी लोणावळ्याजवळील लोहगड, विसापूर किल्ल्यावर निसर्ग साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीराम कोळी (९८९२९०३८६३) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com