ट्रेक डायरी

कोल्हापूरच्या न्यू हायकर्स ग्रुपतर्फे येत्या १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत केलेल्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आयोजित या मोहिमेमध्ये इतिहास अभ्यासक, शाहीर, दुर्गप्रेमी सहभागी होणार आहेत.

पावनखिंड मोहीम
कोल्हापूरच्या न्यू हायकर्स ग्रुपतर्फे येत्या १३ ते १५ जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत केलेल्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आयोजित या मोहिमेमध्ये इतिहास अभ्यासक, शाहीर, दुर्गप्रेमी सहभागी होणार आहेत. या मोहिमेत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, विविध बियांचे रोपणही केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सचिन भोसले (९६२३२५२३५०) यांच्याशी संपर्क साधावा.
पाचगणी-लिंगमळा निसर्ग सहल
वसुंधरा आऊटडोअर्सतर्फे १४ जुलै रोजी पाचगणी-लिंगमळा निसर्गसहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अमोल पोहनकर (९८९०९०८९७२) यांच्याशी संपर्क साधावा.
जिम कार्बेट जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या ७ ते १४ डिसेंबर या कालावधीत ‘जिम कार्बेट’ राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचे आयोजन केले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी नैनीतालजवळ असणाऱ्या या जंगलामध्ये विविध पशु-पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या सफारीत ‘जिम कार्बेट’ शिवाय सातताल, पांगोत भागालाही भेट दिली जाणार आहेत. हा सर्व प्रदेश पक्षिनिरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय छायाचित्रासाठीही अनेक जण या प्रदेशाची भ्रमंती करतात. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
लोहगड भ्रमंती
ठाण्यातील भ्रमर संस्थेच्या वतीने येत्या १३ जुलै रोजी लोहगड भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या भ्रमंतीमध्ये इतिहासाचे अभ्यासक श्रीदत्त राऊत सहभागी होणार आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अनुप (९७०२०१०५०७) किंवा भूषण (९८७०३४३४९०) यांच्याशी संपर्क साधावा.
‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे पुढील वर्षी २५ एप्रिल ते १५ मे १४ दरम्यान ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. या ट्रेकसाठी आवश्यक शारीरिक-मानसिक तयारी गरजेची असते. यासाठी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबोली दर्शन
महाराष्ट्राचे गिरिस्थान असलेले आंबोली हे जैवविविधतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थळ आहे. संपन्न वन्यजीव संपदा असलेल्या या जंगलात अभ्यासकांची भटकंती सतत सुरू असते. या जंगलातील पावसाळी नवलविशेष पाहण्यासाठी
९ ते ११ ऑगस्टदरम्यान एका अभ्याससहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९६६४६४१२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
तोरणा पदभ्रमण
‘व्ही अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या १४ जुलै रोजी तोरणा गडावर पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी नितीन बोडस (९८२२३३०४९५) यांच्याशी संपर्क साधावा.
वॉटर फॉल रॅपलिंग
‘एक्सप्लोर्स’तर्फे येत्या १३ व १४ जुलै रोजी लोणावळा येथे वॉटर फॉल रॅपलिंग आणि फ्लाइंग फॉक्स या साहसी उपक्रमाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आनंद केंजळे (९८५०५०२७२३) यांच्याशी संपर्क साधावा.
लोहगड-विसापूर ट्रेक
‘ट्रेकडी’तर्फे येत्या १४ जुलै रोजी लोहगड-विसापूर या एका दिवसाच्या पदभ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०- २५४५४२०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम
यूथ होस्टेल असोसिएशनच्या मालाड युनिटतर्फे नुकतेच ३० जून रोजी महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांवर ‘प्लॅस्टिक कचरा निर्मूलन मोहीम’ राबविण्यात आली. लोहगड, विसापूर, राजमाची, कोथळीगड, पेब, कर्नाळा, कोर्लई, अवचितगड, राजगड, शिवनेरी, सिंहगड, पुरंदर, अर्नाळा, गोरखगड आदी पंचवीस किल्ल्यांवर एकाच दिवशी ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या २७० गिरिप्रेमींनी सहभाग घेतला. या दुर्गभटक्यांनी या एका दिवसात तब्बल ७५ मोठय़ा पिशव्या कचरा गोळा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trek diry no plastik at tourist place pavan khind jim corbett lohagad