केरळमधील एक वर्षाच्या चिमुकल्याला कोट्यावधी रुपयांचा जॅकपॉट लागल्याचे वृत्त आहे. हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना! हो पण हे वृत्त खरं आहे. युकेमध्ये वास्तव्यास असलेल्या या चिमुकल्याला १ मिलियन डॉलरची लॉटरी लागल्याने तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. लॉटरीच्या या बक्षिसाची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल सात कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद सालाहचे वडील रमीस रहमान हे गेल्या एक वर्षांपासून दुबई ड्यूटी फ्री प्रमोशनमध्ये भाग घेत होते आणि त्यांनी यामध्येच आपल्या मुलाच्या नावाने ऑनलाइन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यांच्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे मंगळवारी झालेल्या लकी ड्रॉमध्ये त्यांचेच लॉटरीचे तिकीट निवडले गेले.

ऑनलाइन लॉटरीमध्ये आपले तिकीट निवडले गेल्याची बातमी ऐकून रमीज रहमान यांनी आपल्याला प्रचंड आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. यासाठी त्यांनी दुबई ड्युटी फ्री प्रमोशनचे देखील आभार मानले. माझ्या मुलाचे भविष्य आता यामुळे अधिक सुरक्षित होईल असेही त्यांनी म्हटले आहे. ३१ वर्षीय रमीज अबुधाबीमधील एका खासगी कंपनीमध्ये अकाऊटंट म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा मोहम्मद सालाह हा येत्या १३ फेब्रुवारी रोजी एक वर्षाचा होत आहे.

युकेमध्ये होत असलेल्या अशा लकी ड्रॉमध्ये आजवर अनेक भारतीयांनी बक्षिसं जिंकली आहेत. गेल्याच वर्षी एक भारतीय शेतकरी दुबई काम मिळत नसल्याने पुन्हा देशात परतला होता. दरम्यान, त्यानं दुबईत त्यानं शेवटचा प्रयत्न म्हणून एक लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. या लॉटरीचा लकी ड्रॉ त्यानं जिंकला होता. त्याच्या लॉटरीचे बक्षिस तब्बल ४ मिलियन डॉलर इतकं होतं. जी रक्कम भारतीय रुपयांमध्ये २८ कोटी ५० लाख रुपये इतकी होते. पत्नीकडून उसने घेतलेल्या पैशातून त्याने हे लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं.