आपल्यापैकी अनेकांना टीव्हीपेक्षा प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन कुठल्याही खेळाचे सामना पाहायला आवडतात. स्टेडियमवर प्रत्यक्ष जाऊन मॅच पाहण्यात वेगळा आनंद तर मिळतोच शिवाय, तिथं ज्या गमतीजमती होतात त्या अतिशय भन्नाट असतात. विशेष म्हणजे स्टेडियममध्ये मॅच बघता बघता फाउल बॉल पकडण्याची मजा काही औरच….स्टेडियममध्ये बसल्यानंतर मैदानावरून येणारा फाउल बॉल पकडल्यानंतर काही जण तर आठवण म्हणून जपून ठेवतात. पण एका १० वर्षाच्या मुलाने फाउल बॉल पकडून एका रडणाऱ्या चिमुरडीला देऊन खूश करत नेटकरी मंडळींचं मन जिंकलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

स्टेडिअममध्ये जसजसे चेंडू स्टॅण्डमध्ये येत असतात, तसतसं स्टार खेळाडूकडून येणारा फाउल बॉल पकडण्याची संधी प्रत्येकजण शोधत असतो. फिलाडेल्फिया फिलीज आणि शिकागो कब्स यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात असंच काहीसं घडलंय. एका 10 वर्षांच्या मुलाने स्टॅंडकडे येणारा एक फाउल बॉल त्याच्या दिशेने येताना पाहिला आणि जमिनीवर पडल्यानंतर त्याने तो बॉल पकडला.

१० वर्षाच्या लहान मुलाने आवडत्या स्टार खेळाडूकडून आलेला फाउल बॉल कॅच केल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हाय-फाइव्ह देताना दिसून येतोय. हा फाउल बॉल पकडता आला नाही म्हणून बाजुला बसलेली सहा वर्षीय एम्मा ब्रॅडी ही लहान मुलगी मात्र नाराज झाली होती. स्टार खेळाडूकडून आलेला हा फाउल बॉल पकडण्याची संधी गमावली म्हणून ही लहान मुलगी रडू लागली. हे पाहून फाउल बॉल कॅच केलेल्या मुलाने हसत हसत रडणाऱ्या मुलीच्या हातात बॉल सोपवला. स्टॅंडमध्ये आलेला फाउल बॉल मिळाल्यानंतर रडणारी ही मुलगी आनंदी होते. त्या क्षणी मुलीचे पालक आणि इतर प्रेक्षकही तितकेच आश्चर्यचकित झाले.

आणखी वाचा : कोंबडीवर ससाण्याचा हल्ला, मदतीला शेळी धावली आणि…! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आणखी वाचा : Video : सलग पाच मिनिटं एकाच पोजिशनमध्ये बसून तरुणीनं रचला विश्वविक्रम!

हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. रडणाऱ्या मुलीला बॉल देणारा व्हिडीओमधला हा १० वर्षाचा मुलगा सध्या सोशल मीडियावर हिट ठरतोय. सीबीएस फिलीने या दयाळू चाहत्याची ओळख आरोन प्रेसली अशी सांगितली आहे. नेटकऱ्यांना या मुलाचा हा व्हिडीओ खूपच भावला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रत्येकजण त्याचं कौतुक करताना दिसून येत आहे.