एखादा अवघ्या 10 वर्षांचा मुलगा पिता बनू शकतो का? एखादी केवळ 13 वर्षांची मुलगी आई बनू शकते का? हे वाचून तुमच्या मनात अनेक प्रश्न घोळत असतील पण असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 10 वर्षाच्या मुलापासून दिवस गेल्याचा धक्कादायक दावा रशियामध्ये केला जात आहे. त्या दोघांनीही आई-वडिलांच्या परवानगीने रशियाच्या एका TV चॅनलवर घटना कथन केली.

डारिया आणि इव्हान हे दोघे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांची कथा ‘द रोसिया 1’ चॅनल शो ‘फादर अ‍ॅट 10 !?’ मध्ये दाखवली गेली आहे.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशी आहे त्यांची प्रेमकहाणी
दोन्ही मुले वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेतात. 13 वर्षांची डारिया आणि 10 वर्षांचा इव्हान यांची मैत्री एक वर्षापूर्वी झाली होती. डारिया आठ आठवड्यांपासून गर्भवती आहे. एका मित्राच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती, असं इव्हानने टीव्ही शोमध्ये सांगितलं. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करायला लागले. आईचा पाठिंबा असून कुटुंबीय लहानग्याची वाट पाहत आहेत असं त्या मुलीचं म्हणणं आहे.

मुलगी प्रेग्नट आहे… आईचे डोळे विस्फारले
डारियाच्या आईनुसार, गरोदरपणाची लक्षणं दिसताच तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यावेळी डॉक्टरांना काही समजलं नाही, नंतर ‘प्रेग्नंसी किट’वरुन ती गर्भवती असल्याचं कळालं. टीव्ही शोमध्ये डारियाची आईदेखील आली होती. गरोदर राहिल्यानंतर त्यांच्या मुलीने 10 वर्षांच्या मुलासोबतच्या नात्याची कबुली दिली, असं डारियाच्या आईने सांगितलं.

असं घडू शकतं का? डॉक्टर म्हणतात..
मेडिकल सायन्सनुसार 10 वर्षांचा मुलगा पिता बनू शकत नाही. तर, स्थानिक डॉक्टर स्कोरोबोगेटोव यांच्यानुसार दोन्ही मुलं आई-बाप बनण्यास सक्षम आहेत. मात्र काही डॉक्टर हे मान्य करायला तयार नाहीत आणि अशाप्रकारचा दावा कसं काय करतायेत म्हणून ते डॉक्टर हैराण आहेत. लोकं मुलीबद्दल विविधप्रकारच्या चर्चा करत आहेत, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, इव्हानच्या आईलाही वाटते की त्यांचा मुलगा खरं बोलत आहे. तो एका मुलाचा बाप होणार आहे. खरंतर त्याला स्वतः याबाबत काही माहित नसेल. त्याने जे केले हे खरं असलं तरी हे सगळं कळण्यासाठी तो खूप लहान आहे, असं त्याच्या आईने म्हटलं. तर, मी आणि माझा प्रियकर एकमेकांची पूर्ण काळजी घेतो असं डारियाने सांगितलं. दोघांनीही सोशल मीडियावर ‘मॅरिड’ म्हणून लिहिले आहे. पण, दोघांनी स्थानिक समाजातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

यापूर्वी कधी घडला होता असा प्रकार ?
2009 मध्ये असाच एक प्रकार ब्रिटनमध्ये झाला होता. 12 वर्षांच्या मुलाने गर्लफ्रेंडच्या मुलाचा बाप बनणार असल्याचा दावा केला होता. या वृत्तानुसार ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. मात्र गर्भधारणेनंतर तो मुलगा आणि बाळाची DNA चाचणी मॅच झाली नव्हती.