News Flash

VIDEO: १२ वर्षाच्या मुलीने तयार केला ३ सेकंदामध्ये कापडाची घडी घालणारा रोबोट

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा रोबोट टी-शर्टची घडी घालतो

VIDEO: १२ वर्षाच्या मुलीने तयार केला ३ सेकंदामध्ये कापडाची घडी घालणारा रोबोट
फातिमा अब्दुल्लाही

गरज ही शोधाची जननी आहे अशी म्हण आहे. त्यातच आळशी लोकांच्या गरजा खूप असतात पण त्या पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्याकडे नसते. घरातील अनेक कामे करण्याचा अनेकांना आळस असतो. असेच एक काम म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणे. कंटाळवाणे आणि नकोसे वाटणारे हे काम करण्यासाठी काही पाश्चिमात्य देशांमध्ये चक्क रोबोट तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रोबोटची किंमत १ हजार डॉलर म्हणजेच ६८ हजार ५०० रुपयांहून अधिक आहे. श्रीमंतांना अशा मशिन घेणे शक्य होते. मात्र इतके पैसे खर्च करण्याची इच्छा नसणाऱ्या आळशी लोकांच काय? कपड्यांची घडी करण्याचा कंटाळा आल्याने अशाच एका मुलीने चक्क घरच्या घरी कपड्यांची घडी घालणारी मशीन तयार केली आहे.

नायझेरियामधील १२ वर्षीय फातिमा अब्दुल्लाही या मुलीने कपड्यांच्या घड्या घलणारा रोबोट तयार केला आहे. रॉयटर्स टीव्हीने या मुलीचा व्हिडिओ ट्विट केला असून त्यामध्ये ती हा रोबोट वापरताना दिसते. फातिमा हा कोडर असून तिने याच कोडींगच्या मदतीने एक स्वस्तातला रोबोट तयार केला आहे. हा रोबोट तीन सेकंदामध्ये टी-शर्टची घडी घालू शकतो.

‘शनिवारी आणि रविवारी खूप कपडे धुतल्यानंतर त्यांच्या घड्या घालण्याच्या कामाला बराच वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून मी हा रोबोट बनवला आहे,’ असं फातिमा सांगते. अमेरिकेमध्ये हजार डॉलरला विकला जाणारा क्लोथ फोल्डींग रोबोट या मुलीने अगदी परवडणाऱ्या खर्चात तयार केला आहे. ‘काही पीन, काही लाईट्सच्या बीम्स आणि एव्ही थ्री ब्रिक्सच्या मदतीने मी हा रोबोट तयार केला आहे,’ असं फातिमा सांगते. एव्ही थ्री ब्रिक्स म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी प्रोग्राम केलेले सर्कीट्स. एखाद्या पुठ्यावर लावलेल्या पिनांप्रमाणे दिसणारा हा रोबोट खरोखरच खूपच चांगल्या प्रकारे कपड्यांची घडी घालतो हे रॉयटर्सच्या व्हिडिओत दिसते.

‘मी आता घरी वापरत असलेला हा रोबोट अगदी प्राथमिक स्तरावरील असून त्यावर आणखीन काम करुन तो अधिक आकर्षक करणार आहे. मी लवकरच असे रोबोट स्थानिक बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे,’ असा विश्वास फातिमाने व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 4:04 pm

Web Title: 12 year old nigerian girl built a cheap robot that folds clothes in three seconds scsg 91
Next Stories
1 …म्हणून ट्रेंड होतोय #sareetwitter?
2 सुटकेनंतर मित्र आणि जेवणापासून दुरावल्याने व्याकुळ झाला, चोरी करुन पुन्हा तुरुंगात आला
3 VIDEO : थेट विमानात जाण्याचा मार्ग समजून ‘ती’ कन्व्हेअर बेल्टवरच बसली
Just Now!
X