आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी एखादा छंद जोपसला असेल. कोणी शिंपले गोळा करण्याचा तर कोणी बसची तिकिटं गोळा करण्याचा. छंद अनेक प्रकारचे असतात आणि छंद जोपसल्याने मानसिक समाधान मिळत असं सांगितलं जातं. मात्र इंटरनेटवर सध्या एका तरुणीचा छंद बघून लोकांच्या अंगावर काटा आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा काय छंद आहे या मुलीचा ज्यामुळे साऱ्यांना त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. तर या मुलीला डास मारुन ते वहीत चिटकवण्याचा छंद आहे. यासंदर्भातील एक फोटोही पोस्ट करण्यात आला असून तो सध्या व्हायरल झालाय.

नक्की पाहा >> Viral Video: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही, ‘नाद करा पण बैलाचा कुठं…’ असंच म्हणाल

डेलिशा डे असं या मुलीचं नाव असून तिने नुकताच यासंदर्भातील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. आधी आणि नंतर अशापद्धतीचा फोटो १२ वर्षीय डेलिशाने ‘हाऊट इट स्टार्डेट अ‍ॅण्ड हाऊ इट्स गोईंग’ या ऑनलाइन चॅलेंजचा भाग म्हणून पोस्ट केल्याचे इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या फोटोतील हाऊट इट स्टार्डेटसाठी तिने एक डास मारल्याचा फोटो पोस्ट करत त्यावर, “मी आताच एक डास मारला,” अशी कॅप्शन लिहिलेला फोटो पोस्ट केलाय. तर नंतरच्या फोटोमध्ये म्हणजेच हाऊ इट्स गोईंगमध्ये तिने एका वहीत मारलेले डास चिटकवल्याचे दिसत आहे. प्रत्येक डासाला क्रमांक दिल्याचेही फोटोत दिसत आहे. फोटोकडे पाहिल्यास तिने आतापर्यंत ८० ते ९० डास मारल्याचे दिसत आहे.

For the ‘how it started’ image, Delisha can be seen to have caught one single mosquito, captioned with a celebratory ‘brooo I just caught a macchar [mosquito]’.

हे ट्विट २६ हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे तर साडेतीन हजारहून अधिक जणांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र अशाप्रकारे वेगळ्या गोष्टींचं कलेक्शन करणारी ही काही पहिली मुलगी नाही. स्लोव्हेनियामधील अ‍ॅण्टोनिया कोझाकोव्हा या मुलीने छंद म्हणून ६२ हजार ५०० हात रुमाल जमा केले होते. तिने रुमाल गोळा करण्याचा स्वत:चाचा विश्वविमक्रम तीनदा मोडला आहे.