News Flash

तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ बाटल्यांपासून बनवले शौचालय

या मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते

तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ बाटल्यांपासून बनवले शौचालय
(छाया सौजन्य: बेटर इंडिया )

भारताच्या अनेक खेड्यात आजही शौचालय नाहीत. जिथे घरात शौचालय नाहीत तिथे शाळांची अवस्था काय असणार म्हणा. तामिळनाडूमधल्या कुरुंबापत्ती गावातील शाळकरी मुलांनाही अशाच समस्येचा सामना करावा लागत होता. शाळेत योग्य असे शौचालय नाहीत. तेव्हा विद्यार्थ्यांना उघड्यावरच लघुशंकेसाठी जावे लागायचे. पण याचबरोबर अनेक समस्या देखील त्यांना येत होत्या. तेव्हा शाळेतील १३ वर्षांच्या चार मुलांनी मिळून आपल्या शाळेत आधुनिक प्रकारचे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. पण गावाकडच्या ठिकाणी शौचालयात युरीन कमोड बसवण्याएवढे पैसे या चौघांकडेही नव्हते. तेव्हा या मुलांनी शक्कल लढवत टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत उपयुक्त असे शौचालय तयार केले आहे.

सुपिक पंडिअन, संतोष, धियनिथी, रगुल, प्रभाहरन या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी शाळेत योग्य शौचालय बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. शौचालयाच्या अभावी या मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण शाळेत लघुशंकेसाठी युरीन कमोड उभारणं शक्य नव्हतं तेव्हा या मुलांनी प्लॅस्टिकच्या २० लिटरच्या बाटल्या वापरून त्यापासून युरीन कमोड बनवले. यासाठी त्यांच्या एका शिक्षकांनी देखील मुलांना मदत केली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी या उपक्रमासाठी निधी गोळा केला. या मुलांनी पाईप आणि रंगकामाचे इतर सामान जमवून शाळेत अखेर आधुनिक पद्धतीचे शौचालय बांधून दाखवलेच.

त्यांच्या या कल्पनेपासून अनेकजण खूश झाले आहेत आणि या मुलांवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. कुरुंबापत्ती ग्राम विकास शाळेचे हे विद्यार्थी आहेत. या मुलांना त्यांच्या कल्पनेसाठी ‘ I CAN २०१६’ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. या पुरस्कासाठी देशभरातील ३ ६०० मुलांनी राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचा विचार करण्यात आला होता. त्यापैकी या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:29 pm

Web Title: 13 year olds student from tamil nadu made toilets from plastic bottles
Next Stories
1 जप्त केलेली दारू ढोसून बिहारचे उंदीर झिंगाट! पोलिसांचा जावईशोध
2 पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाली होती ‘लेडीज स्पेशल’
3 इन्स्टाग्रामवर कोण आलंय पाहा!
Just Now!
X