21 November 2017

News Flash

बापानं ५००००० रुपयांसाठी अल्पवयीन मुलीचं लग्न वृद्धाशी लावलं

लालसेपोटी आपल्या मुलीला शेखच्या स्वाधीन केलं

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 17, 2017 1:58 PM

मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांना देखील पैशाची लाच दाखवत त्यांची तोंडं बंद केली.

एका बापानं केवळ काही रुपयांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न ६५ वर्षांच्या ओमानमधील वृद्धाशी लावून दिलंय. पीडित मुलीच्या आईनं पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. पीडित मुलगी ही हैदराबादमधील असून, ती सोळा वर्षांची आहे. तिच्या वडिलांनी आणि आत्यानी मिळून तिचं लग्न वृद्धाशी लावून दिल्याचा आरोप तिची आई सईदा उन्नीसा यांनी केला आहे.

ओमानचे नागरिक असलेले शेख अहमद लग्नासाठी हैदराबादमध्ये आले होते. ते लग्नासाठी मुलगी शोधत होते. यावेळी त्यांची पीडित मुलीच्या वडिलांशी ओळख झाली आणि यानंतर तिच्या वडिलांनी काही रुपयांच्या लालसेपोटी आपल्या मुलीला शेखच्या स्वाधीन केलं. या व्यवहारात मुलीची आत्याही सहभागी असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांना देखील पैशाची लाच दाखवत त्यांची तोंडं बंद केली. त्यानंतर लगेचच एक हॉटेलमध्ये यांचा निकाह पार पडला, अशी माहिती सईदा यांनी पोलिसांना दिली.

निकाह होताच हा इसम मुलीला घेऊन मस्कतमध्ये फरार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

First Published on August 17, 2017 1:58 pm

Web Title: 16 year old hyderabad girl married to elderly sheikh oman for a payment of rs 5 lakh