02 December 2020

News Flash

आज विकीपीडियाचा वाढदिवस: विकीपीडियाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहितीये का?

१७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी विकीपीडिया अॅक्टिव्ह झाले

विकीपीडिया जगातील पाचवी सर्वाधीक पाहिली जाणारी वेबसाईट

कॉलेज म्हटले की लेकचर्स आणि लेकचर्स म्हटले की प्रोजेक्ट्स आलेच. अगदी बालवाडीपासून ते एमबीए, पीएचडीपर्यंत प्रोजेक्टसाठीचा बेस तयार करण्यासाठी लागणारी माहिती गुगल करायची की पहिलीच झळकते ती त्या विषयावरील विकीपीडिया पेजची लिंक. तर इथून होते विकीपीडियाशी दोस्ती सुरु… मग अगदी एखादा शब्द,शहर, गाव, पान, फळ, फुल अगदी कसलीही माहिती हवी असली की गुगल सर्चमध्ये येणा-या विकीपीडियाला पहिली क्लिक मिळते.

बरोबरच आजच्या दिवशी १७ वर्षापूर्वी विकीपीडियाची साईट इंटरनेटवर लाइव्ह (म्हणजे आज जसं विकीपीडिया दिसते थोडीफार तशी) झाली. विकीपीडिया आज नेटक-यांची प्रमुख गरज आहे. जरी माहिती पूर्णपणे भरोश्याची नसली असे मानले तरी प्राथमिक माहितीसाठी विकीपीडियासारखा सोर्स नाही हे खरे.

विकीपीडियाच्या जन्माची कहाणी

तसं विकीपीडियाला त्याचे नाव आणि त्या नावाने काम जरी २००१मध्ये सुरु झाले असले तरी या वेबसाईटच्या जन्माची कहाणी सुरु होते सन २०००पासून. या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये जेमी वेल्स या इंटरनेटवरील व्यवसायिकाने नुपिडीया ही वेबसाईट सुरु केली होती. या वेबसाईटवर वेगवगेळ्या विषयांमधील तज्ञ लेख लिहीत असतं. नुपिडीया या वेबसाईटला बोमिस या मोठ्या जाहिरात कंपनीकडून पैसा मिळत असे.

जानेवारी २००१ जानेवारीमध्ये जेमी आणि नुपिडीयाचा संपादक लेरी स्रेन्जरने नुपिडीयाला लेख मिळावेत म्हणून विकीपीडिया सुरु केले. प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांकडून त्यांच्या क्षेत्रातील विषयांबद्दल लेख लिहून ते नुपिडीयासाठी वापरण्याची कल्पना या प्रकल्पामागील महत्वाचा हेतू होता. विकीपीडिया हे नाव स्रेन्जरनेच सुचवले होते. विकी या सर्व्हर प्रोग्रामच्या नावावरून त्याने हे नाव सुचवले होते. या सर्व्हर प्रोग्रामच्या मदतीने वेबसाईटवरील मजकूर संपादित करता येत असे.

२००२ साली बोमिस कंपनीने विकीपीडियाला पैसा पुरण्याचे बंद केले. वेल्सने वेबसाईटसाठी पहिला अॅडमिनिस्ट्रेटर नेमला. म्हणजेच जो वेबसाईटच्या पडद्यामागील गोष्टींवर नियंत्रण ठेवतो अशी व्यक्ती.

२००३ मध्ये विकीपीडिया फाऊण्डेशनची स्थापना करण्यात आली. ही नॉन प्रॉफिट फाऊण्डेशन विकीपीडिया आणि त्यासारख्याच वेबसाइट्स चालवते. याच काळात विकीपीडिया वरील इंग्रजी पेजेसची संख्या १ लाखाच्यावर वर गेली.

२००४मध्ये विकीपीडिया ने १०० भाषांमध्ये माहिती लिहीण्याची सोय उपलब्ध करून दिली.

२००५मध्ये पहिल्यांच विकीपीडिया वादात सापडले. पत्रकार जॉन स्रेन्जेन्थ्रीलरबद्दल कोणीतरी पोस्ट केलेल्या लेखामध्ये तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांच्या संक्षयित खून्यापैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले होते. हा लेख कोणी अपलोड केला हे पुढील सहा माहिने कळू शकले नव्हते. नंतर तो मजकूर काढून टाकण्यात आला.

माईलस्टोन्स

२००६मध्ये विकीपीडियावर दहा लाखावे पेज सुरु करण्यात आले. जॉर्डन हिल रेल्वे स्टेशनबद्दल हे पेज होते.

२००७मध्ये पुन्हा एकदा विकीपीडिया वादात अडकले. कंपनीचा कर्मचारी रेयान जॉर्डन याने खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने आपल्याकडे पदव्या असल्याचे दाखवले होते. याच वर्षी विकीपीडियावरील अॅक्टीव्ह युझर्सची संख्या ५१ हजारांवर गेली.

२००८मध्ये विकीपीडियावरील पेजेसची संख्या १ कोटी इतकी झाली

२०११मध्ये विकीपीडियाने मागासलेल्या देशांसाठी विकीपीडीया झिरो नावाची सेवा सुरु केली. इंटरनेट कनेक्शनशिवाय या सेवेच्या माध्यमातून मोबाईलवरून साईटवरील माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

अॅलेक्स इंटरनेट या अग्रगण्य कंपनीच्या आकडेवारीनुसार आज विकीपीडिया जगातील पाचवी सर्वाधीक पाहिली जाणारी वेबसाईट आहे.

आकडे जे आश्चर्यचकित करतील…

> एकूण लेखांची संख्या चार कोटींहून अधिक

> एकूण २९९ भाषांमध्ये विकीपीडिया उपलब्ध

> २ लाख  ८४ हजार ३३२ हून अधिक अॅक्टीव्ह युझर्स

> इंग्रजी भाषेतील एकूण लेख ५५ लाख ५० हजार ५३१

> विकीपीडियावरून एकूण ट्रॅफिकपैकी ५७ टक्के ट्रॅफिक हे इंग्रजी भाषेतील पेजेसवरून येते

>  सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या भाषिक पेजेच्या यादीमध्ये इंग्रजी खालोखाल क्युबियन, स्वीडीश, जर्मन, फ्रेंच आणि डच भाषांचा क्रमांक लागतो

> एकूण युझर्स ७ कोटी २५ लाख ७६ हजार ५५० हून अधिक रजिस्टर युझर्स

> विकीपीडियावरील एकूण युझर्सपैकी ५० टक्याहून अधिक युझर्स हे गुगल सर्चवरून येतात

>  विकीपीडिया जगातील २९९ भाषांमध्ये उपलब्ध आहे

>  दिवसाला विकीपीडियावर ६०० हून अधिक नवीन लेखांची भर पडते

> विकीपीडियावर २४ लाखाहून अधिक फोटो आहेत

> आत्तापर्यंत २.१२ अरब वेळा विकीपीडिया पेजेस संपादित झाली आहेत.

> सेकंदाला विकीपीडियावर १० वेळा संपादन होते

>  विकीपीडियाचे अँडमिनिस्ट्रेटीव्ह राईट्स ४ हजार २० अधिक लोकांकडे आहेत हे लोक दुय्यम पातळीवर काम करतात यांच्यावरही अॅडमिनची एक फौज असते

> महिन्याला २ लाख  ८४ हजार ३३२ हून अधिक अॅक्टीव्ह युझर्स विकीपीडियावर मजकूर अपलोड अथवा संपादित करतात

>  अमेरिकेतील इंडिनापोलीजमध्ये राहणारा जस्टीन कँनपने विकीपीडियावर दाहा लाखाहून आधिक वेळा संपादन करणारा पहिला व्यक्ती ठरला आहे

> विकीपीडियाला ऑनलाइन देणगीतून पैसे येतात तसेच ग्रँण्डस आणि मर्चेंडाइज प्रायोजकांचाही मोठा आधार विकीपीडिया आहे

वरील सगळ्या लेखावरून तुम्हाला विकीपीडियाचा अंदाज आलाच असेल तर वाट कसली बघताय तुम्हीही अपलोड करा एखादं नवीन आर्टिकल विकीपीडियावर. मग ते तुमच्या गावाचं असेल, जिल्ह्याच्या किंवा अगदी तुमच्या शाळेचं किंवा तुमचं स्वत:चही…

(माहितीचा स्रोत: विकीमिडिया फाउंडेशन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 10:16 am

Web Title: 17th anniversary of activation of wikipedia and everything about wikipedia
Next Stories
1 Video : असा जेलीफिश तुम्ही कधीच पाहिला नसेल
2 VIDEO : ही हृदयस्पर्शी प्रेमकथा तुम्हालाही नवी उमेद देईल
3 ड्यू प्लेसीनं घेतलं रबाडाचं चुंबन, प्रेयसी झाली नाराज
Just Now!
X