एका १८ वर्षीय मुलाने अॅपल कंपनीवर चक्क १ अब्ज डॉलर म्हणजेच सात हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. या मुलाचे नाव ओस्मान बाह असे आहे. अॅपल कंपनीने त्याचे नाव एका चोरीच्या घटनेशी जोडल्यामुळे त्याने कंपनीविरोधात हा दावा ठोकला आहे. २०१८ साली अॅपलच्या फेशिअल-रिकग्निशन सॉफ्टवेअरने त्याचे नाव न्यू यॉर्कच्या अॅपल स्टोरमध्ये झालेल्या एका चोरीच्या घटनेशी जोडले होते.

या प्रकरणात पोलिसांनी त्यांला अटकही केली होती. मात्र, एक वर्षांच्या तपासानंतर त्याला निर्दोष सोडण्यात आले. ओस्मानच्या मते चोरी झाली त्या दिवशी तो मॅनहॅटनमध्ये होता. चोरीच्या आदल्या दिवशी त्याचे पाकिट चोरीला गेले होते. या चोरीची त्याने पोलिसांकडे रीतसर तक्रारही नोंदवली होती. या पाकिटात त्याचे लर्नर पर्मिट होते. याच पर्मिटच्या मदतीने अॅपल स्टोअरमध्ये चोरी झाली होती.

पोलीसांनी या घटनेचा तब्बल एक वर्ष कसून तपास केला. प्रत्येक अॅपल स्टोअरमध्ये चोरीची शक्यता टाळण्यासाठी फेशिअल-रिकग्निशन प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीच्या मदतीने संशयीतांचे ट्रॅक्रिंग करता येते. असेच ट्रॅक्रिंग ओस्मानचेही करण्यात आले होते, शिवाय दुकानच्या सीसीटीव्ही फूटेजमध्येही तो दिसला नाही परिणामी त्याला निर्दोष सोडण्यात आहे. परंतु या संपुर्ण चौकशीमुळे त्याला शारिरीक व मानसीक त्रासाचा सामना करवा लागला. दरम्यान समाजात त्याची बदनामीही झाली आणि याची भरपाई म्हणून त्याने अॅपल कंपनीवर सात हजार कोटींचा दावा ठोकला आहे.