पत्त्यांचा बंगला कोसळतात तशा काही सेकंदात एक दोन नव्हे तर १९ इमारती चीनमध्ये कोसळल्या. येथे मोठी दुर्घटना झाली असेल तुम्हाला वाटत असेल तर ही भीती थोडी दूर ठेवा. चीनमधल्या हैंकोऊमध्ये नव्या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील जुन्या इमारती तोडून त्याजागी नव्या इमारती बांधण्यात येणार आहे. आता चीन तंत्रज्ञानाच्या बाबातीत किती प्रगत आहे हे वेगळे सांगायला नको. या इमारती तोडण्यात पुढचे काही महिने खर्च करण्यापेक्षा चीनने या इमारती स्फोटकाने उडवून दिल्या. बघता बघता या १२ मजल्यांच्या उंच १९ इमारती काही सेकंदात कोसळल्या आणि नव्या इमारती बांधण्याचे काम सोप्प झालं.

VIDEO : दोन दिवसांत रस्ता तयार!

मध्य चीनमधल्या हैंकोऊ येथे नव्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इथल्या जुन्या इमारती तोडणे गरजेचे होते. पण या १९ इमारती तोडायच्या झाल्याच तर किती तरी दिवस यामागे वाया जाणार म्हणूनच स्फोटकांचा वापर करून या १९ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. ज्या इमारती तयार करण्यासाठी कित्येक वर्षे लागली असतील त्या फक्त १० सेकंदात उडवण्यात आल्या. यासाठी मोठ्या प्रमाणात विस्फोटकं वापरण्यात आलीत. ५ टनांहून अधिक स्फोटकं या इमारतीत ठेवण्यात आली. त्यानंतर या इमारती उडवण्यात आल्या. अनेक देशांत जुन्या इमारती तोडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आहे. सर्वाधिक वेगाने धावणा-या ट्रेन बनवणे असो की काही दिवसांत रस्ते बांधणे असो आपल्या तंत्रज्ञानाने त्यांनी जगाला थक्क करून ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी काचेचा पूल बांधल्यामुळे चीन चर्चेत आले होते.

VIRAL : आठपैकी फक्त एकच व्यक्ती सोडवू शकतो ‘हे’ कोडे?