मिलींद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोणवार नुकतेच विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या विवाहाची चर्चा झाली ती त्यांच्यामध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे. या दोघांमध्ये ३४ वर्षांचं अंतर. त्यामुळे साहजिकच या लग्नाकडे सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन थोडा वेगळाच होता. पण, या दोघांच्या लग्नासोबतच आणखी एक विवाहसोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आणि अर्थातच यालाही कारण आहे वयामधलं अंतर.
७२ वर्षीय अल्मेडा इरेल ही महिला १९ वर्षीय ग्रे हार्डवीक नावाच्या तरुणासोबत विवाहबंधनात अडकली. या दोघांच्या लग्नानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ग्रेचं वय अल्मेडा यांच्या नातवाइतकं आहे. आजीनं कमी वयाच्या मुलाशी लग्न केल्यानं तिच्या नातवंडांनी तिच्याशी बोलणं सोडून दिलं आहे. तर अल्मेडा यांना त्यांच्या मुलानंदेखील घराबाहेर काढल्याचं अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. अल्मेडा आणि ग्रे यांनी आपली प्रेमकथा सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या दोघांवर टीका करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 5:18 pm