News Flash

अनोखी स्पर्धा! काचेच्या पेटीतून २० किलोची सोन्याची वीट काढा अन् घरी घेऊन जा

२० किलो सोने वीटेच्या स्वरुपात एका बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे

अनोखी स्पर्धा! काचेच्या पेटीतून २० किलोची सोन्याची वीट काढा अन् घरी घेऊन जा

विमानतळ म्हटल्यावर सर्वात आधी डोक्यात येतात ते ड्युटी फ्री प्रोडक्ट. बाहेरील किंमतीपेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंचे अनेकांना आकर्षण असते. मात्र सध्या दुबई विमातळावर ड्युटी फ्री प्रोडक्टबरोबरच आणखीन एका खास गोष्टीचे आकर्षण आहे आणि ती गोष्टमध्ये २० किलो सोन्याची वीट ठेवलेली काचेची पेटी. विशेष म्हणजे तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये दुबईला जात असाल तर ही सोन्याची वीट तुम्ही जिंकू शकता. अगदी थोडेश्या प्रयत्नांनी तुम्ही खरोखरच कोट्याधीश बनू शकता.

दुबई विमानतळावरील २० किलो सोन्याची वीट जिंकण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. हे २० किलो सोने वीटेच्या स्वरुपात एका बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहे. ती वीट यशस्वीरित्या या काचेच्या बॉक्सबाहेर काढणारी व्यक्ती ती २० किलो सोन्याचे वीट घरी घेऊन जाऊ शकते. दुबई विमानतळावरील या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस ती सोन्याची विट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. २० किलो वजनाची वीट बॉक्स बाहेर काढणे हे सोपे काम नाही. कारण काचेच्या बॉक्सला एक छोटे वर्तुळाकार छिद्र असून त्यामधून एकावेळी एक हात आतमध्ये टाकता येतो. अगदी ९० अंशात हात काचेच्या पेटीत टाकून ही २० किलोची वीट उचलून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न लोक करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ही वीट कशी काढावी यासाठी अनेकांनी शक्कल लढवत आहेत. तरी कोणाच्याही प्रयत्नांना अद्याप यश मिळाले नाही.

दुबई विमानतळावरील ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ही स्पर्धा सध्या विमानतळावरील सर्वांसाठीच आकर्षण बनले आहे. तर मग कधी जाताय दुबईला आपले नशिब आजमावण्यासाठी?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 5:23 pm

Web Title: 20 kg gold bar lifting challenge at dubai international airport
Next Stories
1 Apple TV Plus : अ‍ॅमेझॉन फायर स्टिकला टक्कर देण्यासाठी सज्ज
2 नेटकऱ्यांचे ‘मिशन मिम्स’! मोदींना झालेला उशीर आणि मिम्सचा पडलेला पाऊस
3 आता रेल्वे प्रवासातही करा मनसोक्त खरेदी
Just Now!
X