मुंबईवर झालेल्या २६/११ अतिरेकी हल्ल्याला नुकतीच १२ वर्ष पूर्ण झाली. आजही अनेक भारतीयांच्या मनात या हल्ल्याच्या भीषण आठवणी कोरल्या गेल्या आहेत. २६/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत जळगावचा जवान जय देशमुखला हौतात्म्य पत्करावं लागलं. मुळचा जळगाव जिल्ह्यातला रहिवासी असलेला यश देशमुख हा मराठा लाईट इन्फान्ट्रीमध्ये कार्यरत होता.

दोन दिवसांपूर्वी श्रीनरगर परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या लष्कराच्या तुकडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. या धुमश्चक्रीत यश देशमुखला हौतात्म्य स्विकारालं लागलं. या दिवसाआधीच यशने चाळीसगावमधील आपल्या मित्राशी Whats App वर गप्पा मारल्या होत्या. या गप्पांमध्ये मस्करीत यश, आमचं काय आज आहे, उद्या नाही…असं बोलून गेला. पाहा यश आणि त्याच्या मित्रामधलं हे संभाषण

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यानंतर दुसऱ्याच दिवशी यशला अतिरेक्यांशी लढताना आपले प्राण गमवावे लागले. यशचं पार्थिव त्याच्या मुळगावी आणलं असून आज त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.