scorecardresearch

Premium

Video : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे ‘असे’ वाचले तरुणाचे प्राण

जर दैव बलवत्तर असेल तर साक्षात यम जरी समोर उभा राहिला तरी तुम्हाला काहीच होऊ शकत नाही.

Video : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे ‘असे’ वाचले तरुणाचे प्राण

धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, अगदी वेळेच्या बाबतीतही तसेच आहे. अशावेळी वेळ वाचावा म्हणून तो नियम धाब्यावर बसवायलाही इकडेतिकडे पाहत नाही. परंतु अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणे काही वेळा जीवावर बेतू शकते. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नियमोल्लंघन केल्यामुळे काही व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र जर दैव बलवत्तर असेल तर साक्षात यम जरी समोर उभा राहिला तरी तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. असाच प्रत्यय दिल्लीतील एका युवकाला आला आहे.

पादचारी पुलाचा वापर करण्याचा कंटाळा करत असल्यामुळे अनेक जण रेल्वेरुळ ओलांडताना दिसून येतात. मात्र या शॉर्टकटच्या नादात या लोकांना प्राणाला मुकावे लागते. दिल्लीतील मयूर पटेल हा तरुणदेखील या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. मेट्रो चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. मेट्रो स्टेशनवर असलेल्या सरकत्या जिन्याचा वापर न करता मयूर मेट्रोट्रॅकवरुन पलिकडे जात होता. यावेळी समोरच्या फलाटावर एक मेट्रो गाडी उभी होती. मयूर या गाडीच्या समोर आल्यानंतर ही गाडी अचानक सुरु झाली. ट्रेन सुरु झाल्यामुळे मयूरला तिथून पळण्याचा मार्गही न सापडल्यामुळे तो एकाच जागी उभा राहिला. मात्र यावेळी मेट्रोचालकाने प्रसंगावधान दाखवत पटकन मेट्रो थांबविल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ नाही असे म्हणू शकतो.

दरम्यान, खरे पहायला गेलात तर मेट्रोच्या रेल्वे ट्रॅकवर उतरणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. असे केल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते. असे असूनही हा तरुण मेट्रोच्या रुळांवर उतरला ही आश्चर्याचीच बाब आहे. या प्रकाराविषयी मयूरची चौकशी केल्यावर एका फलाटावरुन दुस-या फलाटावर कसे जातात हे माहित नसल्यामुळे आपण असे वागल्याचे मयूरने सांगितले. परंतु मयूरच्या या चुकीची शिक्षा त्याला मिळाली असून दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने त्याला कायद्यानुसार नियमांचे पालन न केल्यामुळे दंड आकारला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 21 year old man crossed metro station plateform train in delhi

First published on: 23-05-2018 at 12:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×