तुर्कस्थानमधल्या एका २१ वर्षीय मुलाने आपल्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्त्या करण्यापूर्णी त्याने ‘फेसबुक लाईव्ह’च्या पर्यायावर क्लिक करून हा आत्महत्येचा व्हिडिओ लाइव्ह केला आहे. प्रेयसीने प्रेमभंग केला म्हणून दु:खी झालेल्या एर्डोगन या तरूणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतली.
फेसबुकवर ‘फेसबुक लाइव्ह’चा पर्याय आहे. या पर्यायावर क्लिक केले असता युजर्स तो त्याचक्षणी काय करतो आहे हे सगळ्यांना दाखवू शकतो. युजर्सच्या अकाऊंटमध्ये असलेल्या प्रत्येक फेसबुक फ्रेंडला लाइव्हवर क्लिक केल्यानंतर नोटीफिकेशन जाते. त्यामुळे सगळेच तो व्हिडिओ बघू शकतात. या मुलाने देखील याच पर्यायावर क्लिक करून आपल्या आत्महत्येचा व्हिडिओ लाईव्ह केला.

‘मी जीव देईन असे सगळ्यांना वारंवार सांगूनही कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता तुम्हाला मी काय करु शकतो यावर विश्वास ठेवावाच लागले असे बोलून या मुलाने स्वतःवर  गोळी झाडली.  त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला दुस-यावेळी मात्र गोळी त्याला लागली आणि तो जमीनीवर पडला.  गोळीचा आवाज ऐकताच त्याच्या घरातले धावून आले आणि त्याला तातडीने रुग्णालयात भरती केले पण दुर्दैवाने त्याचा लगेचच मृत्यू झाला.