मॉडेलिंग विश्वात अमेरिकन मॉडेल केंडल जेनरचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे. कारण या २२ वर्षीय मॉडेलने नामवंत मॉडेल्सना कमाईच्या यादीत मागे टाकले आहे. केंडल २०१७ या वर्षात सर्वाधिक कमाई करणारी मॉडेल ठरली आहे.

एका वर्षात केंडलने तब्बल २.२ कोटी डॉलर म्हणजे १४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिच्या वार्षिक कमाईचाच विषय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. १४० कोटी रुपयांची वार्षिक कमाई करत केंडलने प्रसिद्ध ब्राझिल मॉडेल जिझेल बुंडचनलाही मागे टाकले आहे. २००२ पासून जिझेल मॉडेलिंग क्षेत्रातील कमाईत पहिल्या स्थानावर होती.

वाचा : …म्हणून या शहरात राहतात केवळ ४ माणसे

केंडल ही अमेरिकन टीव्ही सेलिब्रिटी किम कर्दार्शियाँची सावत्र बहिण आहे. सोशल मीडियावरही तिच्या फॅन फॉलोईंगचा आकडा थक्क करणार आहे. केंडलचे इन्स्टाग्रामवर ८.४ कोटी फॉलोअर्स आहेत. २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मॉडेलची यादी जाहीर केली. त्यात केंडल १६व्या स्थानावर होती. तेव्हा ती अवघ्या २० वर्षांची होती.

https://www.instagram.com/p/BcP2ss7jHAj/