05 July 2020

News Flash

26/11 Attacks : ….आणि इंग्लंड संघ दौरा अर्धवट सोडून माघारी परतला

भारत आणि इंग्लंड संघाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली होती. 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जग सुन्न झालं होतं. आजही तो दिवस आठवला की अंग शहारून जातं. कारण भारतावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला. या हल्ल्याचा परिणाम भारतीय क्रिकेट संघावरही झाला होता. २००८-०९ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी सात एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी कटक येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा एकदविसीय सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. मात्र, सामना संपेपर्यंत मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचली होती. इंग्लंड संघाचा तेव्हाचा कर्णधार केविन पीटरसन, कोच पीटर मुअर्स आणि टीम मॅनेजर रेज डिकासो यांनी पुढील सामने न खेळण्याचा निर्णय घेतला.

कटक येथे इंग्लंडचा संघ आणि बीसीसीआय अधिकारी यांच्यात बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर इंग्लंडचा संघ दौर्‍यातल्या उरलेल्या दोन वन डे आणि टेस्ट खेळणार नाही हे स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंड संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता. या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतून चेन्नई येथे हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिका खेळण्यास तयार झाला. इंग्लंड संघातील खेळाडू घरी परतले पण नंतर कसोटी सामने खेळण्यासाठी परत आले. ३ ते १० डिसेंबर दरम्यान होणारी पहिली ट्वेंटी२० चँपियन्स लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

एकदिवसीय सामन्याची मालिका ५-० आणि दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने १-० च्या फरकाने जिंकली. मात्र, २६/११च्या कटू आठवणी भारतीय संघाच्या आणि इंग्लंड संघाच्या कायम स्मरणात राहतील. दोन्ही कसोटी सामन्यापूर्वी भारत आणि इंग्लंड संघाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2018 11:17 am

Web Title: 2611 2008 attacks england cricket team cancel last tow one day 2611 attacks
Next Stories
1 Gymnastics World Cup: दीपा कर्माकरला कांस्य पदक
2 मितालीप्रमाणं मलाही संघाबाहेर काढलं होतं, सौरव गांगुलीची खदखद
3 दुखापतीतून सावरल्यानंतर अव्वल ३० मध्ये परतण्याचे ध्येय!
Just Now!
X