एका ब्रिटिश व्यक्तीने सायकल चालवण्याच्या वेगाचा विक्रम मोडला आहे. ‘कस्टम मेड’ बाईकवर त्याने प्रतितास १७४ मैल (२८० किमी / प्रतितास) वेगाने धावपट्टीवर सायकल चालवली आहे. तो म्हणाला की, सायकच्या वेगाचा आतापर्यंत कोणीही अनुभवला नसेल, असा थरार मी अनुभवला.

नील कॅम्पबेल (वय-४५) ने सायकल चालवण्याच्या वेगाचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने इंग्लडच्या यॉर्कशायरमधील एअरफील्डवर शनिवारी स्लिपस्ट्रीममध्ये आधीच्या विक्रमापेक्षा प्रतितास सात मैल जास्त वेगाने  पोर्शेच्या मागील बाजूस राहून ट्रॅकवरुन हा प्रवास केला. या अगोदर १९९५ चा विक्रम डच चालकाच्या नावे आहे. या विक्रमाने २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी सक्षम अशी बाईक तयार करण्यासाठी या व्यक्तीने कंपनी सोडली व हजारो पौंड खर्च केला. कॅम्पबेल यांनी सीएनएनला सांगितले की, “मला वाटले नव्हते की आम्ही या विक्रमाच्या जवळपासही जाऊ, कारण आम्ही गुरुवार आणि शुक्रवारी चाचणी घेतली होती जी विशेष चांगली झाली नाही. सायकलची बांधणी ही एवढी मजबूत आहे की, आपण अतिशय उत्साहाने त्यावर स्वार होऊन काही आठवडे किंवा अगदी महिनेही प्रवास करू शकतो.

ते पुढे म्हणाले, “आम्हाला काही कळत नव्हते म्हणून आम्ही शनिवारीही गेलो, आम्हाला काय करावे व काय करण्याची आमची क्षमता आहे याचीही कल्पना नव्हती. सुरूवातीस पोर्शने कॅम्पबेलच्या सायकलला ट्रॅकवरून ओढत नेले आणि सोडले, त्यानंतर सायकल सुसाट वेगाने लक्ष्यस्थळाच्या द्वारापर्यंत गेली. तसेच तो म्हणाला की, “असं वाटतं की आपण या थरारक प्रवासात केव्हाही खाली पडू शकतो. त्यामुळे अशा संभाव्य अपघातातून वाचण्यासाठी बाईकमध्ये पॅराशूटची व्यवस्था केली होती. परिणामी भीती वाटत असली तरी विक्रम होण्याची शक्यता वाढली. त्याच्या अद्यावत बाईकला थ्रीडी प्रिंटेड पार्ट आणि कार्बन फायबरची चेन रिंग वापरल्या गेले. ज्यावर किमान १८ हजार डॉलर खर्च आला.

कॅम्पबेलचे पुढील लक्ष्य उटाह येथील बोन्नेव्हिले स्पीडवेवर आणखी वेग वाढवण्याचे आहे.तसेच, जिथे अंतराला मर्यादा नसतील अशा ठिकाणी जायला आम्हाला आवडेल, जेणेकरून आम्ही केवळ जात राहू. २०० मैल प्रतितास वेगाची मर्यादा ओलांडायची असल्याचेही तो म्हणाला.जेणेकरून मागील वर्षी १८३.९ मैल प्रतितास वेगाने सायकल चालवणाऱ्या अमेरिकेच्या डेनिस म्युलर-कोरेनकेला हरवून, जगातील सर्वाधिक वेगाने सायकल चालवणारा व्यक्ती बनता येईल.