बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा कार्यक्रमात लहान मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. अन्यथा मुलं काहीतरी पराक्रम केल्याशिवाय राहत नाहीत. सध्या एका लहानग्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. तीन वर्षांची मुलगी पतंगाच्या शेपटीसोबत आकाशात उडाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

तैवानमध्ये सध्या पतंग महोत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक आणि श्वास रोखून धरायला लावणारी घटना घडली. पंतग महोत्सवादरम्यान एका मोठ्या पतंगाला तीन वर्षांची चिमुरडी अडकली. बघता बघता ही चिमुरडी हवेत उडी लागली. तब्बल १०० फूट उंच गेल्यानंतर अन् मुलीच्या आवाजानंतर लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांचा एकच गोंधळ झाला..

३० सेकंदापर्यंत मुली हवेत पंतगासोबत उडत होती. १०० फूट उंचीवरुन मुलीच्या वजनामुळे आणि हवा कमी झाल्यानंतर पतंग खाली आला. तेवढ्यात त्या मुलीचा हात निसटला अन् ती खाली पडली. खाली उभ्या असलेल्या जमावानं तिला पकडले आणि मुलीचा जीव वाचला.


या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनुसार, या तीन वर्षांच्या चिमुरडीचं नाव लीन असे आहे. मुलीला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर पतंग महोत्सव बंद करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.