News Flash

जंगलात फिरायला गेला अन् नवा मित्र घरी घेऊन आला; ३३ हजार जणांनी शेअर केलेली अनोख्या मैत्रीची गोष्ट वाचलीत का?

"समोरचं दृष्य पाहून काय करावं हेच मला समजत नव्हतं. मी..."

(फोटो : फेसबुकवरुन)

इंटरनेटवर कधी, काय आणि नक्की कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या अशीच एक चर्चा सुरु आहे एका चार वर्षाच्या मुलाबद्दल. या मुलाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. या व्हायरल फोटोंमगील कारण म्हणजे या मुलाचा खास मित्र. आता तुम्ही म्हणाल की मित्रामुळे हा मुलगा अचानक का चर्चेत आलाय. तर हा मित्र साधासुधा नसून चक्क एक छोटं हरीण आहे.

फॉक्स ४०ने दिलेल्या वृत्तानुसार स्टेफनी ब्राऊन आणि त्यांचे कुटुंबिय पिकनिकसाठी व्हर्नियामधील मासान्यूटॅन रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी स्टेफनी यांचा चार वर्षांचा मुलगा डॉमनिक फिरायला जातो सांगून राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणासमोर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये खेळत होता. मात्र काही वेळाने डॉमनिक चक्क एका छोट्या हरणासोबत दारात उभा असल्याचं स्टेफनी यांना दिसलं. हे रिसॉर्ट शेनॅनडोह राष्ट्रीय उद्यानाचा सीमेला लागूनच असल्याने हे छोटं हरीण भटकत भटकत रिसॉर्ट परिसरात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आम्ही घरी जाण्याच्या तयारी असतानाच बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या डॉमनिकला हे हरीण दिसलं आणि नंतर ते त्याच्यासोबतच थेट दारापर्यंत आलं, असं स्टेफनी यांनी म्हटलं आहे.

“माझ्या मुलाला एक छोट्या हरणासोबत पाहून मला पहिल्यांदा नक्की काय वाटलं हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. सुरुवातील मला विश्वासच बसत नव्हता. हे माझ्या मनाचे खेळ आहेत असं मला समोरचं दृष्य पाहून वाटत होतं,” असं स्टेफनी म्हणाल्या. स्टेफनी या फ्रीजमधून खाण्याचे पदार्थ बाहेर काढत होत्या त्याचवेळी त्यांना दाराजवळ पावलांचे आवाज आले. त्या मागे वळाल्या तेव्हा त्यांचा चार वर्षाचा मुलगा त्याच्या उंचीच्या एका छोट्या हरणासोबत दारात उभा होता. विशेष म्हणजे हे हरीण एकदम निवांतपणे डॉमनिकच्या बाजूला उभं होतं. “माझा मुलगा एका छोट्या हरणासोबत दारात उभा आहे हे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी काही सेकंद अगदी स्तब्ध झाले. पुढे काय करावं हे मला सुचत नव्हतं,” असं स्टेफनी यांनी डब्लूबीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

स्टेफनी यांनी लगेच आपला मोबाईल घेऊन दारात उभ्या असणाऱ्या या दोघांचे फोटो काढले. हे फोटो त्यांनी फेसबुकवरुन शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल झाले आहेत. ३३ हजारहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केला असून त्यावर लाईक्सचाही पाऊस पडलाय.

फोटो काढून झाल्यानंतर स्टेफनी यांनी हे हरीण कुठे सापडलं असा प्रश्न डॉमनिकला विचारला असता त्याने, ‘हे तिथे झुडपांमध्ये एकटचं उभं होतं,’ असं उत्तर दिलं. त्यानंतर स्टेफनी यांनी जिथून हरीण तुझ्यासोबत आलं तिथं त्याला सोडून ये असं डॉमनिकला सांगितलं. त्यानेही अगदी प्रेमाने त्या हरणावरुन हात फिरवत पुन्हा त्या झुडपांकडे वाटचाल सुरु केली. ते छोटं हरीणही या मुलाच्या मागेमागे जाऊ लागलं आणि झुडपांजवळ गेल्यानंतर जंगलात पळून गेलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 4:43 pm

Web Title: 4 yo boy went out to the woods alone came back with a baby deer he became friends with scsg 91
Next Stories
1 करोना निर्बंध मोडणाऱ्या पर्यटकांनी पोलीस स्टेशनमध्येच केली ‘जेल पार्टी’; Video झाला व्हायरल
2 अविस्मरणीय… चंद्र प्रकाशातील इंद्रधनुष्य ठरतंय चर्चेचा विषय; जाणून घ्या कुठून दिसलं दृष्य
3 या फोटोत किती बदकं आहेत?; हजारो जणांनी केलाय उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला जमतंय का बघा
Just Now!
X